RR vs KKR, IPL 2024: शेवटच्या सामन्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल? असा राहिलाय राजस्थान - केकेआरचा रेकॉर्ड

RR vs KKR, Head To Head Record: आज आयपीएल २०२४ स्पर्धेत साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान आणि केकेआर हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
RR vs KKR, IPL 2024: शेवटच्या सामन्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल? असा राहिलाय राजस्थान - केकेआरचा रेकॉर्ड
RR vs KKR Head to head record match detaisl rajasthan royals vs kolkata knight riders amd2000google

आयपीएल २०२४ स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. मात्र दुसऱ्या स्थानासाठी चढाओढ सुरु आहे. त्यामुळे या सामन्यातही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

राजस्थान रॉयल्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण प्लेऑफ गाठलं असलं तरीदेखील गेल्या ४ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या दुसऱ्या स्थानी असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी टिकून राहण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

RR vs KKR, IPL 2024: शेवटच्या सामन्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल? असा राहिलाय राजस्थान - केकेआरचा रेकॉर्ड
RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ २९ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सने १४ सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने देखील १४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तरी बरोबरीची लढत आहे. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

कोण मारणार बाजी?

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आपला शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर गेली ४ सामने गमावलेला राजस्थान रॉयल्सचा संघ शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

RR vs KKR, IPL 2024: शेवटच्या सामन्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल? असा राहिलाय राजस्थान - केकेआरचा रेकॉर्ड
IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

कोलकाता नाईट रायडर्स -

रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती इम्पॅक्ट प्लेअर: वैभव अरोरा/सुयश शर्मा

राजस्थान रॉयल्स-

यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार ,यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल,आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, अवेश खान, युजवेंद्र चहल

[इम्पॅक्ट प्लेअर: नांद्रे बर्गर/डोनोवन फरेरा]

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com