करो या मरोच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नईला हरवत आयपीएलच्या प्लेऑफमधील आपलं स्थान पक्क केलं आहे. तर सामना गमावल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएलमधून बाहेर पडला आहे. शेवटच्या साखळी सामन्यात बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा रोमहर्षक सामन्यात 27 धावांनी पराभव केला. चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात, बेंगळुरूने सांघिक खेळीच प्रदर्शन केलं आणि प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ५ गड्यांच्या मोबदल्यात २१८ धावांचं लक्ष्य चेन्नईसमोर ठेवलं होतं. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला २०० किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखण्याची गरज होती आणि बेंगळुरूचा संघाला चेन्नईच्या संघाला १९१ धावांवर रोखण्यात यश आलं.
ऋतुराज गायकवाडला पहिल्याच चेंडूवर बाद करत ग्लेन मॅक्सवेलने CSK ला मोठा धक्का दिला. त्यानंतर डॅरिल मिचेलही यश दयालच्या चेंडूवर विराटच्या हाती झेल देऊन तंबूत परतला, त्याने फक्त ४ धावा केल्या. चेन्नईला ३ षटकांत १९ धावांवर दुसरा धक्का बसला होता. त्यानंतर आलेल्या रचिन रवींद्र व अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरला, त्यांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मात्र १०व्या षटकात ल्युकी फर्ग्युसनने ही जोडी फोडली. अजिंक्य रहाणे ३३ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर संघाची सर्व भीस्त असलेला रचिनही धावबाद झाला आणि चेन्नईला सामन्या कमबॅ करता आलं नाही. त्यानंतर एकापाठोपाठ गडी बाद झाले आणि सामन्यात RCB ने कमबॅक केलं.
बेंगळूरुकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणी फाफ डू प्लेसिसने यांनी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. कोहलीने ३ चौकार आणि ४ षटकार ठोकत ४७ धावा केल्या तर फाफ डू प्लेसिसने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकत ३९ चेंडूत ५४ धावा केल्या. या दोघांनी ७० धावांची भागिदारी केली. रजत पाटीदारनेही फटकेबाजी करत २३ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यात २ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.