Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो. अलीकडेच मिळालेल्या दोन संकेतांवरून तो ही जबाबदारी स्वीकारू शकतो, असे मानले जात आहे.
गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा
Gautam Gambhir, Virat Kohli and Rohit Sharma, T 20 World CupSAAM TV
Published On

टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळं पुढचा मुख्य प्रशिक्षक कोण? असा प्रश्न भारतीय क्रिकेट विश्व आणि चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयनं नव्या मुख्य प्रशिक्षकापदासाठी अर्जही मागवले आहेत. अंतिम मुदत २७ मे आहे. स्टीफन फ्लेमिंग आणि रिकी पॉंटिंगच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ही नावं आता खूपच मागे पडली आहेत. कारण गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.

रिपोर्टनुसार, भारतीय संघाच्या पुढच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ १ जुलैपासून सुरू होणार आहे. तो साडेतीन वर्षांसाठी असू शकतो. गौतम गंभीरचं नाव चर्चेत आलं आहे. कारण बीसीसीआयनं गौतम गंभीरला विचारणा केल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयचा प्रस्ताव स्वीकारून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होण्यास तयार होणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कदाचित गौतम होकार कळवू शकतो असं या २ संकेतांवरून मानलं जात आहे.

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार? संकेत काय?

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गौतम गंभीर सध्या आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा मेंटॉर आहे. त्याच्या मार्गदर्शनात कोलकाता संघानं जबरदस्त कामगिरी केली आहे. कोलकाता हा आयपीएल २०२४ स्पर्धेत प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. इतकंच काय तर गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या यशस्वी कामगिरीनं बीसीसीआयचं लक्ष वेधून घेतलंय.

गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा
RCB Playoff Scenario : RCB प्लेऑफमध्ये कसा पोहोचणार? शक्यता काय आणि किती? समीकरण समजून घ्या!

दुसरी बाब म्हणजे, आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीरने राजकारणातून ब्रेक घेतला आहे. हा ब्रेक दीर्घकाळासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटसाठी योगदान आणि मोठी भूमिका निभावता यावा यासाठी कदाचित हा ब्रेक घेतला असावा, असा कयास लावला जात आहे. यात कितपत तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवेल.

कार्यकाळ किती?

भारतीय संघानं २००७ मध्ये टी २० वर्ल्डकप आणि २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्या दोन्ही स्पर्धांमध्ये गौतम गंभीरनं भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करताना मोठं योगदानही दिलं आहे. अशात तो मुख्य प्रशिक्षक झाल्यास त्याच्या या अनुभवाचा मोठा फायदा भारतीय संघाला होऊ शकेल, असे मानले जात आहे. नव्या प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले असले तरी, मानधन किती असेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा साडेतीन वर्षांसाठी असेल आणि १ जुलैपासून तो सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा
Hardik Pandya : शेवटचा दिस 'कडू' झाला! पराभव तर पराभव, त्यात हार्दिक पंड्या, रोहित शर्मासह अख्ख्या मुंबई संघावर कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com