Breaking News

Neymar Jr In Pune: ठरलं! ब्राझीलचा स्टार नेमार खेळणार पुण्यात; मुंबई सिटीविरूद्ध या मैदानावर रंगणार सामना

Neymar Jr In India: नेमार लवकरच भारतात येणार आहे.
neymer jr
neymer jr saam tv
Published On: 

Neymar Jr Will Play In India In Al Hilal vs Mumbai City FC Match:

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारला भारतात खेळताना पाहण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वीच नेमारने सौदी अरेबियाच्या अल हिलालमध्ये प्रवेश केला आहे. पीएसजीला पाठ दाखवत त्याने अल हिलाल क्लबसोबत करार केला आहे.

याचा फायदा भारतीय फुटबॉल फॅन्सला होणार आहे. एशियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत मुंबई सिटी एफसी आणि सौदी अरेबियातील अल हिलाल हे दोन्ही संघ डी ग्रुपमध्ये आहेत.

neymer jr
IND VS IRE 3rd T2OI: 'हे खूप निराशाजनक होतं..' मालिका जिंकूनही कॅप्टन बुमराह या कारणामुळे नाराज

नेमारचा अल हिलाल संघ मुंबई सिटी एफसी संघासोबत पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी स्टेडियमवर दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरीना येथे होणार होता.मात्र काही अडचणींमुळे हा सामना पुण्यात खेळवला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना दिग्गज खेळाडू नेमारला लाईव्ह खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. (Latest sports updates)

यापूर्वी असं म्हटलं जात होतं की,ख्रिस्तियानो रोनाल्डो भारतात खेळण्यासाठी येणार आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने देखील सौदी अरेबियातील क्लब अल-नसरसोबत करार केला आहे. मात्र एशियन चॅम्पियन्स लिग स्पर्धेत अल- नसरचा ई ग्रुपमध्ये आहेत. एशियन चॅम्पियन्स लिग स्पर्धेला येत्या १८ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. मु्ंबई सिटी एफसी आणि अल-हिलाल हे दोन्ही संघ केव्हा आमने सामने येणार याबाबत कुठलीही माहीती समोर आलेली नाही. लवकरच या स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com