Bullet Train: भारताला मिळणार आणखी एक बुलेट ट्रेन, कुठून- कुठपर्यंत धावणार, स्टेशन कोणते?

Delhi-Howrah Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेननंतर भारतला आणखी एक बुलेट ट्रेन मिळणार आहे. ही बुलेट ट्रेने दिल्ली ते हावडादरम्यान धावणार आहे. हा प्रवास किती तासांचा असणार आहे? आणि कोण-कोणती स्थानके असणार आहेत घ्या जाणून...
Bullet Train: भारताला मिळणार आणखी एक बुलेट ट्रेन, कुठून- कुठपर्यंत धावणार, स्टेशन कोणते?
Bullet TrainSaam Tv
Published On

भारताला लवकरच दुसरी बुलेट ट्रेन मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. आता देशात आणखी एक बुलेट ट्रेन धावणार आहे. दिल्ली ते हावडा दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ही बुलेट ट्रेन दिल्ली ते पश्चिम बंगालमधील हावडापर्यंत धावणार आहे. या ट्रेनचा वेग ताशी ३५० किलोमीटर असेल. त्यामुळे प्रवासांना दिल्लीहून- हावडाला पोहोचण्यासाठी फक्त साडेसहा तास लागतील.

दिल्ली-हावडा बुलेट ट्रेनचा मार्ग कसा असेल?

दिल्ली- हावडा बुलेट ट्रेनच्या मार्गाबद्दल देखील माहिती समोर आली आहे. या बुलेट ट्रेनसाठी ९ स्थानके बांधली जाणार आहे. पहिले स्थानक दिल्लीमध्ये असेल. दिल्लीहून सुटल्यानंतर ही ट्रेन थेट आग्रा कॅन्टला थांबेल. आग्रा कॅन्टनंतर ही बुलेट ट्रेन कानपूर सेंट्रल, नंतर अयोध्या आणि लखनऊ मार्गे वाराणसीला पोहोचेल. वाराणसीहून सुटल्यानंतर ही ट्रेन थेट पाटणा आणि पाटण्याहून आसनसोल येथे थांबेल आणि शेवटचा थांबा पश्चिम बंगालमधील हावडा येथे असणार आहे.

Bullet Train: भारताला मिळणार आणखी एक बुलेट ट्रेन, कुठून- कुठपर्यंत धावणार, स्टेशन कोणते?
Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

पहिला टप्पा कुठून ते कुठपर्यंत असणार?

दिल्ली-हावडा बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्याचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाईल. पहिल्या टप्प्यात ते दिल्ली ते वाराणसी असा पूर्ण केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाराणसी ते हावडा असा पूर्ण केला जाईल. या बुलेट ट्रेनसाठी अंदाजे ५ लाख कोटी रुपये खर्च केला जाईल.

Bullet Train: भारताला मिळणार आणखी एक बुलेट ट्रेन, कुठून- कुठपर्यंत धावणार, स्टेशन कोणते?
Bullet Train: मुंबई-अहमदाबात बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट, १६ वा पूल तयार; अजून किती काम बाकी?

प्रवासाला किती वेळ लागणार?

दिल्ली -हावडा बुलेट ट्रेनला तब्बल १६६९ किमीचा प्रवास करण्यासाठी एकूण साडेसहा तास लागतील. यासोबतच, दिल्ली ते पाटणा हा १०७८ किमीचा प्रवास फक्त चार तासांत पूर्ण होईल. त्यानंतर, ही ट्रेन पाटणा ते हावडा हा ५७८ किमीचा प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण करेल. दिल्लीहून सुटल्यानंतर ही बुलेट ट्रेन उत्तर प्रदेशातील ५ स्थानके, बिहारमधील एक स्थानक आणि पश्चिम बंगालमधील दोन स्थानकांवर थांबेल. या ट्रेनसाठी पाटण्यामध्ये ६० किमीचा एलिव्हेटेड ट्रॅक बांधला जाणार आहे.

Bullet Train: भारताला मिळणार आणखी एक बुलेट ट्रेन, कुठून- कुठपर्यंत धावणार, स्टेशन कोणते?
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; बीकेसी-शिळफाटादरम्यान बोगदा पूर्ण, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com