Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Eknath Shinde Meet Amit Shah In Delhi: ऐन अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा दिल्ली दरबारी पोहचला. पावसाळी अधिवेशन एकीकडे चालू असताना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची अचानकपणे भेट घेतली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे भाजपवर दबाव आणत आहे का? दुसरं काही प्लॅन आखला जातोय? अशा वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
DCM Eknath Shinde
Eknath Shinde Meet Amit Shah In Delhilive Hindustan
Published On

राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्ली गाठली. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागील नेमकं काय कारण, याबाबत तर्क-वितर्क काढले जाताहेत. हिंदी सक्तीचा निर्णय, आमदार निवासमधील शिंदे सेनेच्या आमदाराची मारहाण नंतर संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीसमुळे शिंदे गटाला धडकी भरलीय.

त्याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा काढला. यात त्यांनी भाजप मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन दिवसापुर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत आले आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही त्यांनी भेट घेतल्याचं वृत्त आहे.

अधिवेशन चालू असताना एकनाथ शिंदेंनी दिल्ली का गाठली आणि या नेत्यांची भेट का घेतली? या भेटी सत्रामागील कारण काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. या भेटीमागे राज्यातील राजकीय स्थिती कारणीभूत असू शकते. तसेच मंत्रिमंडळात दिवसेंदिवस कमी होणार महत्त्व. या गोष्टी दिल्ली दौऱ्यासाठी कारणीभूत असू शकतात. दरम्यान विरोधी पक्षांनी या दौऱ्यावरून महायुतीला टार्गेट करत युतीमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलंय. मंत्रिमंडळात वाद चालू असून त्यात आपला बचाव व्हावा यामुळे शिंदेंनी दिल्ली गाठली असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

संजय शिरसाट आणि श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस:

खासदार श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांनी विधान केल्यानंतर विधानभवन परिसरात मोठी खळबळ उडाली. पण त्यानंतर शिरसाट यांनी आपल्या विधानाची सरावासावर केली. आणि आपल्याला आयकर विभागाची नोटीस असल्याचं ते म्हणाले.

DCM Eknath Shinde
मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

पालकमंत्रिपदाचा तिढा

रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीचा तिढा कायम आहे. दोन्ही ठिकाणी शिंदे गटाला पालकमंत्रिपद हवे आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी त्यावर दावा करत आहे, तर नाशिकमध्ये भाजप पालकमंत्रिपदासाठी दावा करत आहे, त्यामुळे शिदे गटात नाराजी कायम आहे. दुसरीकडे शिंदेंच्या कार्यकाळातील काही प्रकल्पांची चौकशी तर काही प्रकल्प रद्द करण्यात आली आहेत.

हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे झालेली कोंडी

महायुतीच्या सरकारनं शिक्षण पद्धतीत बदल करत पहिली इयत्तापासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याचा जीआर काढत पहिलीपासून मुलांना तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्याचा आदेश दिला. त्याला शिंदे गटाने पाठिंबा दिला. मात्र विरोधकांना सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला.

मनसे आणि ठाकरे गटाने त्या विरोधात वज्र मुठ आवळत सरकार विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यात महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या गटाने हिंदी सक्तीला विरोध केला. विरोधी पक्षांचा वाढता विरोध आणि मराठी माणसांचे जनमत पाहता सरकारने हिंदी सक्ती आणि त्रिभाषेचा अध्यादेश रद्द केला. मात्र यात सर्वात एकनाथ शिंदेंच्या गटाची कोंडी झाली.

मनसे- ठाकरे गट एकत्र

राज्यात आणि आगामी मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मराठी माणूस म्हणून महायुतीकडे एकनाथ शिंदे हे एक चेहरा होते. परंतु मराठीच्या मुद्द्यामुळे शिंदे गटावर टीका होऊ लागली होती. त्यामुळे मराठी माणसांच्या मनातील शिंदे सेनाविरोधात रोष वाढू लागला. मराठीच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. दोघांनीही महानगरपालिका आणि इतर निवडणुका एकत्र लढवण्याचं निर्धार केलाय. त्यामुळे शिंदे गटाचं महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे.

संजय गायकवाड यांची दादागिरी

आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणावरुन आमदार निवासातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. यानंतर गायकवाडांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली. यावरून मुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदेंनी समज द्यावी असं म्हटलं होतं. त्यामुळेही शिंदे गटाविरोधात असंतोष निर्माण होतोय.

अजित पवार यांच्यावर नाराजी

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहेत. निधी वाटपावरून शिंदे गटाकडून अजित पवार यांच्यावर टीका केली जातेय. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या निधीला कात्री लावण्यामुळे नाराजी असल्याचं म्हटलंय जातंय. या सर्व कारणावरून शिंदे भाजपवर दबाव आणू पाहत आहे का? का भाजप शिंदेंना अजून मागे सारण्याचा प्रयत्न करत आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com