मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

Sanjay Shirsat Latest News : मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः कबुल केलं की त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. संपत्ती वाढीवर खुलासा मागवण्यात आला असून ब्लॅक मनीबाबत वक्तव्य व्हायरल झालंय.
Minister Sanjay Shirsat Income Tax Notice :
Minister Sanjay Shirsat Income Tax Notice : Saam TV News Marathi
Published On

Minister Sanjay Shirsat Income Tax Notice : मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधानही यावेळी संजय शिरसाट यांनी या कार्यक्रमात केलेय. संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महाराष्ट्राच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Minister Shirsat Admits Receiving I-T Notice, Viral Video Creates Buzz)

आयकर विभागाकडून नोटीस आल्याची कबुली संजय शिरसाट यांनी जाहीर कार्यक्रमात दिली. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत. हे विधान फक्त माझ्यासाठीच आहे, असे म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांची एकाच हशा पिकला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती, आता २०२४ च्या निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असा सवाल आयकर विभागाकडून संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. ९ तारखेला पैशांबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आल्याचेही शिरसाट यांनी कार्यक्रमात सांगितले. याबाबतचा व्हिडिओ संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय आहे.

Minister Sanjay Shirsat Income Tax Notice :
Pune-Nashik Expressway: गुड न्यूज! आता पुणे-नाशिक फक्त ३ तासात, सरकारचा २८४२९ कोटींचा प्लान, वाचा कसा असेल नवा हायवे?

छत्रपती संभाजीनगरात एक कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. आता यापुढं ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केलंय. पुढं जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हंटलय. त्यानंतर हशा पिकला. सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याची त्यांनी जाहीर कबुली दिली. 2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असे विचरल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मला 9 तारखेला खुलासा करण्याचे सांगितल्याचेही त्यांनी सांगितले. पैसे कमावणे सोपे आहे मात्र ते वापरायचे कसे? हे अवघड झाल्याचंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com