Bullet Train: मुंबई-अहमदाबात बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट, १६ वा पूल तयार; अजून किती काम बाकी?
मुंबई- गुजरात बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे आता अतिशय वेगाने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण होणारा हा सोळावा नदी पूल आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टअंतर्गत गुजरातमध्ये एकूण २१ पूल बांधले जाणार आहेत.
एनएचएसआरसीएलने १६ व्या नदी पुलाचे काम पूर्ण केले आहेत. पाच नदी पुलांपैकी पाचही वलसाड जिल्ह्यात आहेत. जे आता पूर्ण झाले आहेत. अहमदाबाद ते मुंबई या संपूर्ण कॉरिडॉरवर २५ नदी पूल बांधले जात आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रोजेक्ट आहे. या बुलेट ट्रेनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई आणि अहमदाबाद या दोन प्रमुख शहरांना जोडेल जाणार आहे. हा ५०८ किमी लांबीचा मार्ग आहे. या बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी ३२० किमी असेल.
वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआर मार्ग सुमारे ५६ किमी लांबीचा आहे. हा मार्ग जरोली गावापासून सुरू होतो आणि वाघलदरा गावात संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा बोगदा, ५ नदी पूल आणि १ पीएससी पूल (२१० मीटर) यांचा समावेश आहे. वलसाडमध्ये तयार झालेल्या या पुलाची लांबी ३६० मीटर आहे. त्यात प्रत्येकी ४० मीटरचे ९ पूर्ण स्पॅन गर्डर यांचा समावेश आहे. घाटाची उंची - १९ ते २९ मीटर असणार आहे. यासोबतच त्यात ४ मीटर आणि ५ मीटर व्यासाचे प्रत्येकी एक आणि ५.५ मीटर व्यासाचे ८ वर्तुळाकार खांब आहेत. हा पूल बोईसर आणि वापी बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान आहे.
बोईसर आणि वापी या दोन्ही स्थानकांमधील आणखी एक नदी पूल दारोठा नदीवर पूर्ण झाला आहे. ही नदी वापी बुलेट ट्रेन स्टेशनपासून १ किमी आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनपासून सुमारे ६१ किमी अंतरावर आहे. वलसाड जिल्ह्यात पूर्ण झालेल्या इतर नदी पुलांमध्ये औरंगा (३२० मीटर), पार (३२० मीटर), कोलक (१६० मीटर) आणि दारोठा (८० मीटर) या पुलांचा समावेश आहे.
दमन गंगा नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वालवेरी गावाजवळील सह्याद्री टेकड्यांमधून उगम पावते. ही नदी महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमणमधून सुमारे १३१ किमी वाहते आणि नंतर अरबी समुद्रात विलीन होते. या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी केला जातो. ही नदी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. वापी, दादरा आणि सिल्वासासारखी औद्योगिक शहरे या नदीच्या काठावर आहेत. नदीवर बांधलेले मधुबन धरण हा एक प्रमुख जलसंपदा प्रकल्प आहे जो गुजरात, डीएनएच आणि दमण आणि दीवला सिंचन, पाणीपुरवठा आणि वीज निर्मितीसाठी पाणी पुरवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.