
तो ना शंख वाजवतोय… ना चक्र फिरवतोय… पण तरीही शत्रूंच्या काळजाचा ठोका चुकतोय. नाव आहे विष्णू… पण तो पुराणातला नाही. तो येतोय भारताच्या रक्षणासाठी, पाहा मिसाईलच्या आवाजानं शत्रूला अद्दल घडवणारा विष्णू . या रिपोर्टमधून जाणून घेऊया या विष्णूबद्दल...
जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा विष्णू पृथ्वीवर येऊन धर्माची पुनर्स्थापना करतो. गरज पडल्यास उग्र रूप धारण करून राक्षसी शक्तींवर विजय मिळवणारा विष्णू. आता चीन पाकिस्तानसारख्या देशाच्या शत्रूनाही विष्णू धडकी भरवणार आहे. भारत विष्णु हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची तयारी करत असून हे जगातील सर्वात घातक मिसाईल्सपैकी एक असेल, ज्याला कोणतंही रडार किंवा संरक्षण प्रणाली अडवू शकणार नाही.
शत्रूला भारताच्या 'विष्णू'ने धडकी भरवली आहे. विष्णु ही एक मल्टी-रोल हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल आहे. याची गती सुमारे 10–12 हजार किमी प्रति तास आहे. सुमारे ५,००० किमीची क्षमता असलेले हे विष्णू आहे. विष्णू परमाणु शस्त्रवाहक मिसाईल आहे. जमिनीवरून, हवेतून आणि समुद्रातून मारा करण्याची क्षमता विष्णूमध्ये आहे. हे मिसाईल भारताची अण्वस्त्र प्रतिरोधक क्षमता ही मजबूत करते.
या हायपरसोनिक मिसाईलमुळे भारत आशियात गेम चेंजर ठरेल तसंच चीन आणि रशिया यांच्या बरोबरीला येईल. पाकिस्तानच्या कोणत्याही मिसाईल सिस्टमपेक्षा विष्णू प्रगत असून डीआरडीओच्या चाचणीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे फक्त पाकिस्तानच नाही तर रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, स्पेन, फ्रान्ससोबतच न्यूयॉर्क देखिल भारताच्या टप्प्यात येईल. त्यामुळे आता भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांनो, हा विष्णू शंख फुंकणारा नव्हे तर थेट आगीचा वर्षाव करणारा आहे इतकंच लक्षात ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.