पाकविरोधात 'वॉर', भारताकडे आता 'स्टार', ब्रह्मोसच्या जोडीला विध्वंसक 'स्टार मिसाईल'; पाक- चीनला धडकी

Star Missile : ऑपरेशन सिंदूरनं दाणादाण उडवल्यानंतर आता पाकिस्तानची धडकी भरवणारं नवं मिसाईल भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मात्र हे स्टार मिसाईल नेमकं काय आहे? त्यामुळे पाक आणि चीनच्या पायाखालची जमीन का सरकलीय?
Brahmos Paired with Star Missile
Brahmos Paired with Star MissileSaam TV News
Published On

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकच्या क्षेपणास्त्रांना बेचिराख करून टाकलयं. त्यातच भारत DRDO च्या माध्यमातून सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल तयार करतोय. हे स्वदेशी सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल स्वदेशी असून ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्रांना पर्याय म्हणून वापरता येईल. भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करापुढे असणाऱ्या आव्हांनाना तोंड देण्याच्या दृष्टीनं हे मिसाईल डिझाइन करण्यात आलेय. DRDO ने विकसित केलेल्या या सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलची सध्या चाचणी सुरू आहे.

पाकविरोधात 'वॉर', भारताकडे 'स्टार'

सुपरस़ॉनिक टार्गेट मिसाईलचा वेग 3,062 किमी

तिन्ही दलासाठी सुपरस़ॉनिक टार्गेट मिसाईल उपयुक्त

शत्रूचं रडार आणि AWACS प्रणाली नष्ट करण्यासाठी उपयुक्त

55 ते 175 किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम

Brahmos Paired with Star Missile
फळांच्या राजाला अमेरिकेनं नाकारलं, ट्रम्प तात्यांचा दुट्टपीपणा उघड; पाकचा आंबा मात्र अमेरिकेसाठी गोड

सुपरसॉनिक टार्गेट मिसाईलमुळे भारताची सामरिक शक्तीत भरच पडणार आहे. या मिसाईलच्या निर्मितीमुळे भारत शस्त्रसज्जतेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होईल. त्यामुळे संरक्षण साधन साम्रगीची इतर देशातील आयात कमी होऊन संरक्षण क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल. यामुळे सुपरसॉनिक टार्गेट मिसाईल हे भारताच्या आत्मनिर्भर शस्त्रसज्जतेच्या वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल आहे, हे निश्चित.

Brahmos Paired with Star Missile
Operation Sindoor: मदरशांमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' शिकवले जाणार, भाजपशासित राज्यात मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com