Operation Sindoor: मदरशांमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' शिकवले जाणार, भाजपशासित राज्यात मोठा निर्णय

Uttarakhand Madarsas: पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूरला’ आता शालेय पुस्तकांमध्ये स्थान मिळणार आहे.
Operation Sindoor
Operation SindoorSaam tv
Published On

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेच्या कहाणीला आता शालेय पुस्तकांमध्ये स्थान मिळणार आहे. विशेष म्हणजे, उत्तराखंडमधील मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या ऑपरेशनचा समावेश केला जाणार आहे, अशी घोषणा उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुफ्ती शामुन कासमी यांनी केली आहे.

कासमी यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले, "भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून केलेली कारवाई प्रेरणादायी आहे. याची माहिती मुलांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक वर्गांपर्यंत ऑपरेशन सिंदूरचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे."

"मुलांना केवळ धार्मिक शिक्षण न देता आधुनिक शिक्षणाशी जोडणे ही काळाची गरज आहे. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी कारवाई नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल होते. त्यामुळे मदरशांमध्ये सकाळच्या नमाजाच्या वेळीही या मोहिमेबाबत माहिती दिली जाईल", असं कासमी यांनी स्पष्ट केलं.

Operation Sindoor
Pune: पुणे महापालिकेचा रिचार्ज संपला? ११०० अधिकाऱ्यांच्या फोनचे आउटगोइंग बंद! कारण काय?

पाकिस्तानवर तीव्र शब्दांत टीका

कासमी यांनी पाकिस्तानवर टीका करताना म्हटले की, "२२ एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आमच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला केला. अशा देशाचे नाव पाकिस्तान नसून ‘नापाकिस्तान’ असायला हवे. त्यांनी इस्लामच्या शिकवणुकीचाही अपमान केला आहे", असं कासमी म्हणाले.

Operation Sindoor
Chhagan Bhujbal: अखेर छगन भुजबळ मंत्री झाले! मंत्रिपदाची घेतली शपथ; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

ते पुढे म्हणाले, "देव म्हणतो की एका निरपराध व्यक्तीचा खून म्हणजे संपूर्ण मानवजातीचा खून असतो. परंतु पाकिस्तान याला मानत नाही. त्यामुळे अशा घटनांविरोधात विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचं आहे", असं कासमी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com