Rohit sharma statement before IPL 2026
Rohit sharma statement before IPL 2026SAAM TV

Rohit Sharma: 'तुमच्यासाठी यंदा ६ वी ट्रॉफी...', रोहित शर्माकडून MI च्या फॅन्सना आश्वासन, वाचा काय म्हणाला हिटमॅन

Rohit sharma statement before IPL 2026: आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्स नव्या जोशात सज्ज झाली आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली टीम सहाव्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे.
Published on

येत्या काही दिवसात आयपीएलच्या १९ व्या सिझनला सुरुवात होणार आहे. आयपीएल 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा नव्या जोशात मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे. गेल्या काही सिझनमधील अपयशांनंतर यंदा टीमकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातायत.

यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आपल्या स्पर्धेची सुरुवात 29 मार्चपासून करणार आहे. पहिल्याच सामन्यात त्यांचा सामना कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध होणार असून हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर सुरुवात करण्याचा टीमला फायदा होण्याची शक्यता आहे.

Rohit sharma statement before IPL 2026
IPL 2026: IPL सुरू होण्याआधी दारू सोडली, दिग्गज खेळाडूनं एबीसमोर सांगितलं कारण

स्पर्धेपूर्वी टीममध्ये एकजूट वाढवण्यासाठी नेहमीप्रमाणे यंदाही विशेष बॉन्डिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला. यंदा या कार्यक्रमाला ‘द मिक्स’ असं नाव देण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खेळाडूंनी मोकळेपणाने संवाद साधला.

या कार्यक्रमात टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मा विशेष आकर्षण ठरला होता. यावेळी रोहितने फॅन्ससोबत बोलताना साधताना 'आम्ही यंदा सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू,' असं आश्वासन दिलंय. रोहित आपल्या मुलीसोबत कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने चाहत्यांशी खूप गप्पा मारल्या.

टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या आपल्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबत या कार्यक्रमाला उपस्थित होता. टीममधील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि मॅनेजमेंटमधील सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान चाहत्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.

Rohit sharma statement before IPL 2026
IPL 2026 injury update: IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडण्याच्या मार्गावर

मुंबई इंडियन्सचा गेल्या काही वर्षांचा प्रवास मात्र अपेक्षेप्रमाणे राहिलेला नाही. 2020 पर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या टीमला त्यानंतर एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. 2024 मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये टीम शेवटच्या स्थानावर राहिला होती. तर गेल्या सिझनमध्ये सुरुवातीच्या पाच सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकण्यात त्यांना यश आलं होतं. मात्र त्यानंतर टीमने जोरदार कमबॅक करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. पण अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आलं.

Rohit sharma statement before IPL 2026
IPL Updates : ३ वेळा आयपीएल विजेत्या ठरलेल्या संघाला तिसरा झटका; प्रमुख खेळाडू स्पर्धेबाहेर

यंदा मात्र मुंबई इंडियन्सची टीम चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. फलंदाजी हा टीमचा मोठा मजबूत भाग मानला जातोय. रोहित शर्मा यांच्यासोबत तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रेयान रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक यांसारखे दर्जेदार फलंदाज टीममध्ये असल्याने मुंबई इंडियन्स यंदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com