IPL 2026 injury update: IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडण्याच्या मार्गावर

IPL 2026 Blow: आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीच अनेक टीम्सना दुखापतींचा फटका बसला आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, हर्षित राणा आणि मथीशा पाथिराना यांसारखे महत्त्वाचे खेळाडू सुरुवातीचे सामने गमावू शकतात.
IPL 2026 injury update
IPL 2026 injury updatesaam tv
Published On

आयपीएल सुरु होण्यासाठी आता फक्त १० दिवस उरले आहेत. २८ मार्चपासून या लीगला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक टीम तयारीला लागली आहे. मात्र काही टीम्सना दुखापतींचे ग्रहण लागल्याचं दिसतंय. दुखापत झालेले काही खेळाडू आहेत जे संपूर्ण सिझनमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. या खेळाडूंमध्ये मॅचविनर खेळाडूंचाही समावेश आहे.

हर्षित राणामुळे केकेआर अडचणीत

कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे या सिझनमधून टीमबाहेर जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात तो सहभागी झाला होता. यावेळी तो कुबड्यांच्या साहाय्याने चालताना दिसला होता. यावरून त्याच्या दुखापतीची तीव्रता दिसून येते.

IPL 2026 injury update
IPL 2026: धोनी, रोहित, कोहली...IPL 2026 मधील सर्वात वयस्कर 10 खेळाडूंची यादी पाहिली का?

जोश हेजलवुडमुळे आरसीबीच्या गोलंदाजीवर परिणाम

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर आहे. तो अजूनही पूर्णपणे फीट झालेला नाही. जर तो आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही, तर आरसीबीला त्याच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये बदल करावे लागू शकतात.

IPL 2026 injury update
Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

पॅट कमिंसची अनुपस्थिती

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सदेखील पूर्णपणे फीट नाही. तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असं मानलं जातंय. त्याच्या अनुपस्थितीचा परिणाम टीमवर तसेच कर्णधारपदावर होऊ शकतो.

IPL 2026 injury update
IPL 2026 : हैदराबादला नवा कर्णधार मिळणार; 'या' दोन नावांची जोरदार चर्चा

मथीशाच्या रूपात केकेआरला दुसरा झटका

केकेआरने ऑक्शनमध्ये मथिशा पाथिरानावर तब्बल १८ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र तो आता टी-२० वर्ल्डकप दरम्यान जखमी झाला होता. आता त्याची दुखापत टीमसाठी चिंतेचा विषय बनली आहे. जर तो खेळला नाही तर टीमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com