कोलकाता संघाला तिसरा मोठा झटका, महत्वाचा प्लेअर आयपीएल स्पर्धेबाहेर
KKR Team Practice session saam tv

IPL Updates : ३ वेळा आयपीएल विजेत्या ठरलेल्या संघाला तिसरा झटका; प्रमुख खेळाडू स्पर्धेबाहेर

IPL 2026 Setback Akash Deep Injury Weakens KKR Bowling Attack : आयपीएल २०२६ स्पर्धेपूर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघाला तगडा झटका मिळाला आहे. संघातील तिसरा महत्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर झाला आहे. तर काही दिवसांत आणखी एक झटका बसणार आहे.
Published on

जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएलमधील अनेक संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. एकेक खेळाडू दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर होत असतानाच, कोलकाता नाइट रायडर्स संघाला मोठा हादरा बसला आहे. संघातील तिसरा महत्वाचा गोलंदाज स्पर्धेतून आउट झाला आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज आकाश दीप दुखापतीमुळं आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही.

रिपोर्टनुसार, आकाश दीप हा स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास आहे. अद्याप तो या दुखापतीतून सावरलेला नाही. त्याच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाला आहे. काही दिवसांपासून तो बेंगळुरूत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रिया पूर्ण करत आहे. त्यामुळे तो या आयपीएल पर्वात खेळू शकणार नाही. आकाश दीप हा पश्चिम बंगालचा खेळाडू असून, मिनी ऑक्शनमध्येच कोलकाता संघानं त्याला एक कोटी रुपये बेस प्राइसवर खरेदी केला होता.

केकेआरची गोलंदाजी कमकुवत

तीन वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता संघाला तगडा झटका मिळाला आहे. संघाची गोलंदाजी अत्यंत दुबळी झाली आहे. ऑक्शननंतर आकाश हा तिसरा गोलंदाज यंदाची आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही. सर्वात आधी केकेआर संघानं बीसीसीआयच्या आदेशानंतर बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रेहमान याला रीलीज केलं होतं. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू हर्षित राणा हा दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर झाला. आता आकाश दीपही यंदा आयपीएल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

कोलकाता संघाला तिसरा मोठा झटका, महत्वाचा प्लेअर आयपीएल स्पर्धेबाहेर
IPL 2026: IPL सुरू होण्याआधी दारू सोडली, दिग्गज खेळाडूनं एबीसमोर सांगितलं कारण

चौथा नंबर कुणाचा?

कोलकाता संघानं या तीन गोलंदाजांची रिप्लेसमेंट जाहीर केलेली नाही. लवकरच ती नावे जाहीर केली जातील, असे सांगण्यात येत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील या संघामागचं ग्रहण अद्याप संपलेलं नाही. ऑक्शनमध्ये १८ कोटी देऊन खरेदी केलेला वेगवान गोलंदाज मतीषा पथिराना देखील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. टी २० वर्ल्डकप स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वर्ल्डकप स्पर्धा खेळू शकला नव्हता. त्यानंतरही तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. जोपर्यंत तो फिटनेस टेस्ट पास होत नाही तोपर्यंत त्याला आयपीएल स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं श्रीलंका क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं आहे. तो एप्रिलच्या मध्यावधीत संघात कमबॅक करेल, अशी केकेआरला अपेक्षा आहे.

कोलकाता संघाला तिसरा मोठा झटका, महत्वाचा प्लेअर आयपीएल स्पर्धेबाहेर
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला जबरा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट, कोण आहे तो?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com