आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर आयपीएल संघमालक आणि बीसीसी आयचे अधिकारी यांच्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान या मेगा ऑक्शनबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. मुंबई इंडियन्स आपला कर्णधार हार्दिक पंड्याला आगामी हंगामात रिलीझ करू शकते. गेल्या हंगामात मोठी रक्कम मोजून हार्दिकला संघात स्थान दिलं गेलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून ही जबाबदारी हार्दिककडे सोपवली गेली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, हार्दिक पंड्याला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
आयपीएल स्पर्धेच्या नियमानुसार दर ३ वर्षांनी मेगा ऑक्शन होतं. आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. आतापर्यंत जे नियम आहेत, त्यानुसार प्रत्येक संघाला ४ खेळाडू रिटेन करण्याची अनुमती दिली गेली आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तात असा दावा केला गेला आहे की, यावेळी रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या वाढू शकते. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं जात आहे की, मुंबई इंडियन्स कुठल्याही परिस्थितीत रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवला सोडणार नाही.अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पंड्याला जाऊ देऊ शकतो. माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होऊ शकतो. कारण तो सध्या भारतीय टी -२० संघाचा कर्णधार आहे. यासह चौथा खेळाडू म्हणून तिलक वर्माचाही मुंबई इंडियन्स संघात समावेश केला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.