IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण

Abhishek Nayar On Team India Defeat: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण
india vs sri lanka twitter
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत समाप्त झाला. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या होत्या. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि सामना हिसकावून घेतला. दरम्यान या सामन्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण
IND vs SL : गेमचेंजर गोलंदाज! ७ षटके, ६ गडी आणि टीम इंडिया ढेर; कोण आहे जेफ्री वँडरसे?

सामन्यानंतर बोलताना अभिषेक नायर म्हणाला की, ' हे खूप आश्चर्यचकीत करणारं होतं. मात्र अशा परिस्थितीत सामना कुठल्याही बाजूला फिरू शकत होता. कारण खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती.' या बोलायचं झालं तर, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २०८ धावांवर आटोपला. रोहित शर्मा आणि अक्षर पटेलला सोडलं तर उर्वरित सर्वच फलंदाज या सामन्यात अडचणीचा सामना करताना दिसून आले.

IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण
IND vs SL,2nd ODI: टीम इंडियाची स्थिती 'गंभीर'; जेफ्री वँडर्सेचा विकेट्सचा षटकार, भारताचा दारुण पराभव

तसेच अभिषेक नायर पुढे म्हणाला की, ' जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या सामन्यातही नवीन चेंडूवर फलंदाजी करणं अधिक सोपं होतं. चेंडू जुना झाल्यानंतर फलंदाजी करणं कठीण होतं. मुख्यतः ५० षटकांच्या सामन्यात असं होत असतं.'

' आम्ही ज्या चुका केल्या त्यावर आम्हाला अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल. सलग दुसऱ्या सामन्यात असं का झालं? याचा आम्हाला विचार करावा लागेल. पहिल्या सामन्यात आम्ही भागीदारी करण्यात यशस्वी ठरलो होतो.' या सामन्यात २४१ धावांचा पाठलाग करताना एकट्या रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com