नवी दिल्ली : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या दुसऱ्या वनडे मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ९ गडी गमावून २४० धावा कुटल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज २०८ धावांवर ढेर झाले. श्रीलंकेने भारताला ३२ धावांनी धूळ चारली. ७ षटकात ६ गडी बाद करणारा श्रीलंकेचा गोलंदाज भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरला.
जेफ्री वँडरसेच्या गोलंदाजीने भारतीय खेळाडूंची झोप उडवली. लेग स्पिनर गोलंदाज असणाऱ्या जेफ्रीने भारतीय फलंदाजांना चकवा दिला. त्याने ३ वर्षांनंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. जेफ्रीने विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे या दिग्गज खेळाडूंना तंबूत पाठवलं. जेफ्रीला दुखापतग्रस्त लेग स्पिनर वानिंदु हसरंगाच्या जागी खेळण्यास संधी मिळाली. त्याने निवडकर्त्यांना निराश केलं नाही.
श्रीलंकेचा गोलंदाज जेफ्री वँडरसे हा ३४ वर्षांचा गोलंदाज आहे. श्रीलंकेतील गम्पाहा जिल्ह्यातील उपनगर वट्टाला येथील निवासी आहे. त्याने फक्त ३७ सामने खेळले आहेत. टीम इंडियाविरुद्ध त्याचा दुसरा सामना होता. जेफ्री टॉप स्पिन, गुगली आणि स्लाइडरसहित अनेक प्रकार फिरकी गोलंदाजी करतो. जेफ्री उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने ३ अर्धशतक मारत १ हजार धावा कुटल्या आहेत. त्याचं करिअर २०१५ साली सुरु झालं होतं.
जेफ्रीने पहिला सामना ३० जुलै २०१५ साली पाकिस्तानविरोधात खेळला होता. त्याने टी-२० सामना खेळला होता. या सामन्यात ४ षटकात २५ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर २८ डिसेंबर २०१५ साली त्याने न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळत वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं होतं.
जेफ्रीचा भारताविरुद्ध दुसरा सामना होता. तो भारताविरुद्ध पहिला सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. जेफ्री दुखापतग्रस्त झाल्यानंतर स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर गेला होता. विराटचा चौकार अडवताना जेफ्रीला दुसऱ्या खेळाडूची टक्कर लागली होती. त्यानंतर जेफ्रीला दुखापत झाली होती. तर दुसऱ्या खेळाडूलाही दुखापत झाली होती.
जेफ्रीला २०१८ साली एका वर्षासाठी निलंबित केलं होतं. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली होती. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कारवाई केली होती. त्याच्यावर वेस्टइंडिज दौऱ्यावर असताना सामन्याच्या एक दिवस आधी रात्री चोरून मित्रांसोबत नाइट क्लबमध्ये पार्टीसाठी गेल्याचा आरोप होता. तो रात्रभर नाइट क्लबमध्ये होता. बोर्डाने कारवाई केल्यानंतर त्याला श्रीलंकेला पाठवलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.