Asia Cup 2025: चक्र उलटंच फिरलं! पाकिस्तानलाच भारतात यावं लागणार; एशियन क्रिकेट काऊन्सिलकडून मोठी घोषणा

Asia Cup 2025 News In Marathi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याची चिन्ह आहेत.
Asia Cup 2025: चक्र उलटंच फिरलं! पाकिस्तानलाच भारतात यावं लागणार; एशियन क्रिकेट काऊन्सिलकडून मोठी घोषणा
ind vs paksaam tv
Published On

आशिया कप २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? अशी चर्चा सुरु होती. अखेर या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत केले गेले होते. या स्पर्धेत श्रीलंकेला पराभूत करत भारताने आशिया कप उंचावला होता. दरम्यान आगामी आशिया कप २०२५ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानलाच भारतात यावं लागणार आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे.

ही स्पर्धा भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे. कारण २०२६ मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा भारतीय संघाच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. यासह आणखी एक मोठी घोषणा देखील करण्यात आली आहे. २०२७ मध्ये होणारी आशिया कप स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Asia Cup 2025: चक्र उलटंच फिरलं! पाकिस्तानलाच भारतात यावं लागणार; एशियन क्रिकेट काऊन्सिलकडून मोठी घोषणा
Paris Olympics 2024: चिराग- सात्विकराज जोडीला मोठा धक्का! दुसऱ्या फेरीतील सामना रद्द; हे आहे कारण

आशिया कपमध्ये भारतीय संघाचा दबदबा

आशिया कप स्पर्धेचा इतिहास पाहिला, तर भारतीय संघाने आतापर्यंत ८ वेळेस या स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे. यादरम्यान ७ वेळेस वनडे तर १ वेळेस टी-२० फॉरमॅटमध्ये ही ट्रॉफी उंचावली आहे. तर श्रीलंकेचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेने आतापर्यंत ६ वेळेस आशिया कपची ट्रॉफी उंचावली आहे. तर पाकिस्तानचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानला केवळ २ वेळेस ही ट्रॉफी उंचावली आहे.

Asia Cup 2025: चक्र उलटंच फिरलं! पाकिस्तानलाच भारतात यावं लागणार; एशियन क्रिकेट काऊन्सिलकडून मोठी घोषणा
Team India News: हा स्टार खेळाडू घेणार विराटची जागा! दिग्गजाने सुचवलं नाव

भारतीत संघाने गतवर्षी झालेल्या आशिया कप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेच्या फायनलचे आयोजन श्रीलंकेत केले गेले होते. फायनलमध्ये श्रीलंकेचा डाव अवघ्या १५.२ षटकात ५० धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६.१ षटकात विजय मिळवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com