IND vs SL,2nd ODI: टीम इंडियाची स्थिती 'गंभीर'; जेफ्री वँडर्सेचा विकेट्सचा षटकार, भारताचा दारुण पराभव
श्रीलंकेत भारतीय संघाचा फ्लॉप शो सुरुच आहे. दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघ्या २४१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. मात्र गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारतीय संघाला हवा तसा शेवट करता आला नाही.भारताचा संपूर्ण डाव २०८ धावांवर आटोपला आहे. भारतीय संघाला या सामन्यात ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह श्रीलंकेने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २४१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली होती. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून ९७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ६४ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने ३५ धावांची खेळी केली. सलामी जोडी सुपरहिट ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना हव्या तितक्या धावा करता आल्या नाहीत. विराट कोहली अवघ्या १४ तर शिवम दुबे शून्यावर माघारी परतला.
या सामन्यातही अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला. त्याने ४४ चेंडूंचा सामना करत ४४ धावांची खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. श्रेयस अय्यर ७, केएल राहुल शून्यावर आणि वॉशिंग्टन सुंदर १५ धावा करत माघारी परतला.
जेफ्री वँडर्सेच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज
श्रीलकेंचा फिरकी गोलंदाज जेफ्री वँडर्से भारतीय संघाच्या विजयाच्या मध्ये उभा राहिला. त्याने १० षटकात ३३ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. यादरम्यान त्याने रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली , शिवम दुबे, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरला बाद केलं. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने ३२ धावांनी विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

