Paris Olympics 2024, Badminton: गोल्डचं 'लक्ष्य' हुकलं! ब्राँझची आशा कायम; Lakshya Sen चा उपांत्य फेरीत पराभव

Paris Olympics 2024, Badmiton Semi Final lakshya sen vs viktor axelsen Result: भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न हुकलं आहे.
Paris Olympics 2024, Badminton: गोल्डचं 'लक्ष्य' हुकलं! ब्राँझची आशा कायम; Lakshya Sen चा उपांत्य फेरीत पराभव
LAKSHYA SENTWITTER
Published On

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत २०२४ स्पर्धेत लक्ष्य सेनला बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्याची संधी होती. मात्र ही संधी लक्ष्य सेनने गमावली आहे. २२ वर्षीय लक्ष्य सेनचा ऑलिम्पिक मेडलिस्ट विक्टरकडून २२-२० २०-१४ ने पराभव झाला आहे.

लक्ष्य सेन हा ऑलिम्पिक स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश करणारा भारताचा पहिलाच पुरुष बॅडमिंटनपटू ठरला होता. त्याला हा सामना जिंकून फायनल जिंकण्याची संधी होती. आपला पहिलाच ऑलिम्पिक खेळत असलेल्या लक्ष्यने आपल्या स्पीडच्या बळावर अनुभवी विक्टरला मागे सोडलं. मात्र विक्टरने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला. लक्ष्यचा विक्टरच्या अनुभवासमोर काही निभाव लागला नाही.

Paris Olympics 2024, Badminton: गोल्डचं 'लक्ष्य' हुकलं! ब्राँझची आशा कायम; Lakshya Sen चा उपांत्य फेरीत पराभव
Paris Olympics 2024, Hockey: भारताची सेमिफायनलमध्ये थाटात एन्ट्री! ग्रेट ब्रिटेनला शूट- 'आऊट' करत रचला इतिहास

या सामन्यातील सुरुवातीला लक्ष्य बॅकफूटवर होता. विक्टरने ३-० ने शानदार सुरुवात केली. दोघांमध्ये लांबच लांब रॅली सुरु होती. सुरुवात विक्टरने केली. मात्र त्यानंतर लक्ष्यने दमदार कमबॅक केलं. लक्ष्यने ५-२ ने दमदार कमबॅक केलं. या सेटमध्ये लक्ष्य सेन आघाडीवर होता. २०-१७ ने आघाडीवर असलेल्या लक्ष्य सेनचा विक्टरने यशस्वी पाठलाग केला. त्याने ३ गेम पॉईंट घेत पहिला सेट २२-२० ने आपल्या नावावर केला.

Paris Olympics 2024, Badminton: गोल्डचं 'लक्ष्य' हुकलं! ब्राँझची आशा कायम; Lakshya Sen चा उपांत्य फेरीत पराभव
IND vs SL, 1st ODI: पहिल्याच वनडेत गौतम गंभीरचा हा निर्णय चुकला! इथंच टीम इंडियाने सामना गमावला

पहिल्या सेटमध्ये पिछडल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या सेटमध्ये दमदार कमबॅक केलं. विक्टरने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला लक्ष्यने उत्तर दिलं. या सेटमध्ये लक्ष्यने ७-० ने आघाडी घेतली होती. ७-० असताना,लक्ष्य आघाडीवर होती. दुसऱ्या सेटमध्ये पहिला पॉईंट मिळवण्यासाठी विक्टरला प्रचंड वाट पाहावी लागली. इथून दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. हा सेट विक्टरने २०-१४ ने आपल्या नावावर केला. यासह लक्ष्य सेनचा सेमिफायनलमध्ये पराभव झाला. ब्राँझ मेडलसाठी त्याचा सामना मलेशियाच्या ली जी जियासोबत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com