कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा थरार सुरु आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत समाप्त झाला होता. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेने ५० षटकअखेर ९ गडी बाद २४० धावा केल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या आहेत.
गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला या डावात हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्याच चेंडूवर सिराजने निसंकाची दांडी गुल केली. त्यानंतर अविष्का फर्नांडोने ६२ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. कुसल मेंडिसने ४२ चेंडूंचा सामना करत ३० धावांचे योगदान दिले.
या सामन्यातही श्रीलंकेच्या फलंदाजांना मधल्या षटकांमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नाही. १३६ धावसंख्येवर श्रीलंकेचे ६ संघ माघारी परतले होते. त्यावेळी जनिथ लियांगे आणि वेलालागेने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर वेलालागेने या सामन्यात ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज. शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका: चरिथअसालंका (कर्णधार) पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.