IND vs SL, Sri Lanka Squad: वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! 2 प्रमुख खेळाडूंना केलं संघाबाहेर

Sri Lanka Squad For IND vs SL ODI Series: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आहे.
IND vs SL, Sri Lanka Squad: वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! 2 प्रमुख खेळाडूंना केलं संघाबाहेर
sri lanka cricket teamtwitter
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेला २ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने वनडे आणि टी-२० मालिकेसाठी एकत्र संघ घोषित केला होता. तर श्रीलंकेने तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी चरिथ असलंकाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दसून शनाका आणि अँजेलो मॅथ्यूजला या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

केव्हा होणार सुरुवात?

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला २ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना ४ ऑगस्ट आणि तिसरा सामना ७ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर विराट कोहली आणि कुलदीप यादव देखील या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे.

IND vs SL, Sri Lanka Squad: वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! 2 प्रमुख खेळाडूंना केलं संघाबाहेर
Paris Olympics 2024: मनू भाकर आणखी एक पदक जिंकून देणार? जाणून घ्या चौथ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक

या मालिकेसाठी असा आहे श्रीलंकेचा संघ:

चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानगे, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षाना, अकिला धनंजय, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना,असिथा फर्नांडो, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेललागे.

टी -२० मालिकेत भारतीय संघाचा विजय

या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली होती. सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ४३ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com