

इंडियन प्रीमियर लीगचा १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू झाला आहे. या स्पर्धेत ५ वेळा ही ट्रॉफी जिंकलेला चेन्नई सुपर किंग्स संघ ३० मार्च रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आपला पहिला सामना खेळणार आहे. या आधी चेन्नईच्या संघला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा सर्वात मोठा खेळाडू आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी या सामन्यात दिसणार नाहीये.
२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ४४ वर्षीय धोनी आता केवळ आयपीएलमध्येच खेळतोय. वयामुळे त्याला आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवणे थोडे कठीण झाले आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे धोनी आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर असणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्या पुनरागमनाकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.