MI vs KKR: वानखेडे स्टेडियममध्ये भिडणार मुंबई इंडियन्स केकेआरचा संघ; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट

IPL 2026 MI Vs KKR : आयपीएल २०२६ मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. संभाव्य प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टीचा अहवाल आणि सामन्याचा अंदाज जाणून घ्या.
IPL 2026 MI Vs KKR :
Mumbai Indians and Kolkata Knight Riders gear up for an exciting clash at Wankhede Stadium.saam tv
Published On
Summary
  • MI आणि KKR यांच्यात वानखेडेवर सामना

  • फलंदाजांसाठी अनुकूल पिच

  • मोठ्या धावसंख्येची शक्यता

आयपीएलच्या १९ व्या हंगामातील पहिला सामना अत्यंत रोमांचक झाला. शनिवारी झालेल्या बंगळूरू आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात आरसीबीनं दिमाखात विजय मिळवला. आयपीएल २०२६ चा दुसरा सामना आता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. हा सामन्यातही मोठी धावसंख्येचा होईल, अशी शक्यता आहे.

IPL 2026 MI Vs KKR :
Virat-Anushka : RCB च्या विजयानंतर विराट कोहलीचा आनंद गगनात मावेना; अनुष्का शर्माला दिली Flying Kiss, क्यूट VIDEO तुफान व्हायरल

मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा हा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर, म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सायंकाळी ७:०० वाजता नाणेफेक होईल . त्यानंतर अर्ध्या तासातच म्हणजेच ७:३० वाजता सामना सुरू होईल.

या खेळाडूंवर असणार नजरा

मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. तर केकेआरच्या फिन ऍलन, टिम सेफर्ट, कॅमेरॉन ग्रीन आणि अजिंक्य रहाणे यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतील. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार आहे, तर रहाणे केकेआरचे नेतृत्व करतो. त्यामुळे दोन्ही कर्णधार आपल्या संघाला पहिला सामना जिंकवण्याचा प्रयत्न करतील.

IPL 2026 MI Vs KKR :
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला तगडा झटका; आयपीएलच्या सलामीलाच वर्ल्डकप उपविजेत्या संघाचा 'कॅप्टन'च बाद

वानखेडे स्टेडियम खेळपट्टी अहवाल

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी घातक मानली जाते. या खेळपट्टीवर गोलंदाजांची नेहमीच धुलाई होते. येथे कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करता येतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये अनेक स्फोटक फलंदाज असल्याने या सान्यात धाव फलकावर मोठी धावसंख्या लागण्याची शक्यता आहे.

सामन्याच्या भाकितानुसार, हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. हा सामना दोन्ही संघ जिंकू शकतात. त्यामुळे ५०-५० अशी स्थिती आहे. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या जिंकण्याची शक्यता अधिक आहे. केकेआरकडे मजबूत फलंदाजी आहे, पण त्यांची गोलंदाजी कमकुवत राहिली आहे. दुसरीकडे मुंबईची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही भक्कम दिसत आहे.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, शेरफेन रदरफोर्ड, हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स/कॉर्बिन बॉश, नामंधीर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

इम्पॅक्ट प्लेयर - मयंक मार्कंडे

कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

फिन ऍलन, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अंकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि उमरान मलिक.

इम्पॅक्ट प्लेअर - अंगकृष्ण रघुवंशी किंवा कार्तिक त्यागी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com