Virat-Anushka : RCB च्या विजयानंतर विराट कोहलीचा आनंद गगनात मावेना; अनुष्का शर्माला दिली Flying Kiss, क्यूट VIDEO तुफान व्हायरल

IPL 2026 Viral Video : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील पावर कपल आहे. अनुष्का अनेक वेळा विराटला पाठिंबा देण्यासाठी मॅच पाहायला येते. आता RCBच्या विजयानंतरचा 'विरुष्का'चा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
IPL 2026 Viral Video
Virat-Anushkasaam tv
Published On
Summary

आयपीएल २०२६ च्या पहिला सामना आरसीबीने जिंकला.

विराट कोहलीने अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिली.

आयपीएलचा पहिला सामना आरसीबी विरुद्ध एसआरएच मध्ये झाला.

आता सर्वत्र फक्त IPL ची चर्चा पाहायला मिळते. आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. हा सामना पाहण्यासाठी आणि विराटला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का शर्मा आली होती. विराट कोहली मैदानावर असताना अनुष्का शर्मा स्टँड्समध्ये बसून त्याला प्रोत्साहन करताना कायम दिसते. आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यादरम्यान हे दोघे एकत्र दिसले. आरसीबीच्या विजयानंतर विराटचा आनंद गगनात मावेना. त्याने मैदानावरूनच अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिला. त्याचा हा क्यूट व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२६ चा पहिला सामना बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात खेळला गेला. आरसीबीने सामना जिंकला. विराट कोहली नाबाद ६९ धावा करून सामना संपवून परतत होता. विराटने सर्वांना शुभेच्छा दिला, हात मिळवला. त्यानंतर मैदानावर चालताना अनुष्का शर्माच्या दिशेने बॅट फिरवून तिला फ्लाइंग किस दिला. तेव्हा अनुष्का शर्मा विराटकडे पाहतच राहिली आणि तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली. त्यानंतर तिने देखील विराटला फ्लाइंग किस दिला. अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता. त्यांचा हा गोड क्षण कॅमेरात कैद झाला.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. अनुष्काने 2021 ला मुलगी वामिकाला जन्म दिला. त्यानंतर 2024 मध्ये त्यांना मुलगा झाला, ज्याचे नाव अकाय आहे. दोघे कायम एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. विराटने आपल्या खेळाने संपूर्ण देशाचे नाव रोशन केले आहे. आता चाहते त्याच्या आगामी मॅचची वाट पाहत आहेत.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यांच्या प्रेमाचे कौतुक करत आहे. अनुष्का शर्मा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत. चाहते अनुष्का शर्माच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

IPL 2026 Viral Video
Anurag Dobhal : अनुराग डोभाल बनला बाबा; काही दिवसांपूर्वी केला होता आत्महत्येचा प्रयत्न, बाळाला हातात घेताच झाला भावुक | VIDEO

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com