Anurag Dobhal : अनुराग डोभाल बनला बाबा; काही दिवसांपूर्वी केला होता आत्महत्येचा प्रयत्न, बाळाला हातात घेताच झाला भावुक | VIDEO

Anurag Dobhal Become Father : प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभालच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. अनुराग डोभाल बाबा झाला आहे. त्याने एक खास पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
Anurag Dobhal Become Father
Anurag DobhalSAAM TV
Published On
Summary

युट्यूबर अनुराग डोभाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे.

अनुराग डोभाल नुकताच बाबा झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अनुरागने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.

प्रसिद्ध युट्युबर अनुराग डोभाल गेल्याकाही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याला यूके07 रायडर म्हणून सोशल मीडियावर ओळखले जाते. तो बिग बॉसचा स्पर्धक देखील होता. अलिकडेच, त्याने आपल्याच कुटुंबावर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्याने आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न देखील केला. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर आणि जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर अनुराग डोभालच्या आयुष्यात आनंद आला आहे.

अनुराग डोभालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अनुराग डोभाल बाबा झाला आहे. अनुरागची बायको रितिकाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. रामनवमीच्या विशेष दिवशी अनुराग आणि रितिका आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला आहे. पायाला फॅक्चर असताना देखील आपल्या बाळाला पाहण्यासाठी अनुराग डोभाल हॉस्पिटलमध्ये पोहचला आहे. याचा खास व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. तसेच व्हिडीओला भावुक कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिलं की, "माझा दुसरा जन्म माझ्या मुलासाठी..."

अनुराग आपल्या मुलाला हातात घेऊन खूप रडतो. तो खूपच भावुक होतो. व्हीलचेअरमध्ये बसून अनुराग मुलाला पाहायला गेला. त्याच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे. त्याला शुभेच्छा देत आहेत. तसेच अनुराग डोभाल आणि रितिकाचे देखील हॉस्पिटलमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या आयुष्यात आता सर्व ठीक व्हाव, अनुराग आणि रितिका एकत्र यावे अशा इच्छा व्यक्त करत आहेत.

अनुराग आणि रितिकाने ३० एप्रिल २०२५ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. 5 मार्च रोजी अनुरागने एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला. त्याने व्हिडीओत आपल्याला कुटुंबाकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे त्याची बायको रितिका चौहान घर सोडून निघून गेली, असे सांगितले. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तो 'बिग बॉस 17'चा स्पर्धक राहिला आहे.

Anurag Dobhal Become Father
Dhurandhar 2 : 'धुरंधर २'नं 'पुष्पा २'ला पछाडलं; दुसऱ्या शनिवारी रणवीर सिंहने रचला मोठा इतिहास, वाचा कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com