Anurag Dobhal : १५० च्या स्पीडमध्ये कार, डोळ्यात अश्रू; युट्यूबर अनुराग डोभालचा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO व्हायरल

Anurag Dobhal Viral Video : UK07 रायडर म्हणून ओळखला जाणारा अनुराग डोभाल याने Live दरम्यान जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Anurag Dobhal Viral Video
Anurag Dobhalsaam tv
Published On
Summary

युट्यूबर अनुराग डोभाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे.

अनुराग डोभालने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

अनुराग डोभालाचा दिल्लीत मोठा अपघात झाला.

प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस 17' फेम अनुराग डोभाल (Anurag Dobhal ) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. अनुराग डोभाल हा UK07 रायडर म्हणून ओळखला जातो. 5 मार्च रोजी अनुरागने एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला. त्याने व्हिडीओत आपल्याला कुटुंबाकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे त्याची बायको रितिका चौहान घर सोडून निघून गेली. अशात आता अनुराग डोभाल यांने आता आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

अनुराग डोभाल याने रात्री सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम) लाइव्ह गेला होता. जिथे तो गाडी चालवताना दिसत आहे. तेव्हा त्याच्या गाडीचा अपघात होतो. व्हिडीओत तो आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना दिसत आहे. बायकोने सोडून जाणे आणि कौटुंबिक संघर्षामुळे तो खचला आहे. तो म्हणतो की, "आई पुढच्या वेळी येईल तेव्हा माझ्यावर खूप प्रेम कर..." व्हिडीओत त्याची गाडी वेगाने धावताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी अनुराग डोभाल म्हणतो की, "हा माझा शेवटचा निरोप..." या व्हिडीओवर नेटकरी खूप कमेंट्साचा वर्षाव करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अनुराग डोभालचा अपघात दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवर झाला. त्याची फॉर्च्यूनर कार दुभाजकाला धडकली. अनुराग डोभाल हा 150 किलोमीटर प्रतितास वेगाने कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण गमावले आणि अपघात झाला. पोलीसही घटनास्थळी पोहचले. या घटनेत गाडीचे देखील नुकसान झाले. व्हिडीओत अनुराग ढसाढसा रडताना दिसत आहे.

व्हिडीओ पाहून चाहते खूपच दुःखी झाले आहेत. या अपघातानंतर अनुराग डोभाल रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याला काही जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून तो सध्या ICU मध्ये उपचार घेत आहे. अनुराग डोभालला अपघातानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.अनुराग डोभाल डिप्रेशनचा सामना करत आहे. ज्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

Anurag Dobhal Viral Video
Elvish Yadav : "तू माझ्याशी लग्न करशील..."; एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज, रोमँटिक VIDEO होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com