Sakshi Sunil Jadhav
महिला दिन भारतात मोठ्या उत्साहात आणि जवळपास प्रत्येक घरात साजरा केला जातो.
महिला दिन हा सण नसला तरी महिलांसाठी हा स्पेशल दिवस असतो. या दिवशी प्रत्येक महिलेला आईला, बायकोला, बहिणीला म्हणजेच स्त्रियांना शुभेच्छा दिल्या जातात.
महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा आंतरराष्ट्रीय दिवस २० व्या शतकाच्या सुरुवातीला युरोप आणि उत्तर अमेरिकेतील कामगार चळवळींपासून सुरु झाला होता.
जर तुम्ही तुमच्या बायकोला या दिवशी काही खास स्वस्त पण मस्त गिफ्ट देणार असाल तर पुढील गोष्टींचा नक्कीच विचार करा.
तुमच्या दोघांचा खास फोटो सुंदर फ्रेममध्ये लावून गिफ्ट करा. हे छोटं सरप्राईज तिच्यासाठी कायम आठवणीत राहणारे ठरेल.
बायकोला आवडणारे चॉकलेट्स किंवा खास मिठाई घेऊन छोटंसं सरप्राईज द्या. स्वस्त गिफ्ट असलं तरी त्यामागची भावना तिला नक्कीच आनंद देईल.
साधे पण सुंदर इअररिंग्स किंवा ब्रेसलेट गिफ्ट देऊ शकता. दररोज वापरता येईल असं ज्वेलरी गिफ्ट तिला खूप आवडेल.
तिच्यासाठी स्वतःच्या शब्दात एक प्रेमळ पत्र किंवा कार्ड लिहा. तुमच्या भावना व्यक्त करणारा हा गिफ्ट तिच्यासाठी सर्वात खास ठरेल.
महिला दिनी घरकामात मदत करा किंवा तिच्यासोबत बाहेर फिरायला जा. तुमचा वेळ आणि साथ हेच तिच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट ठरेल.