'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित आहे.
'धुरंधर २' दुसऱ्या शनिवारी 'पुष्पा २'ला मागे टाकले आहे.
सध्या जगभरात रणवीर सिंहची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर आदित्य धरचे कौतुक होत आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'ने अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत इतिहास रचला आहे. हा स्पाय थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने एका आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. दुसऱ्या शनिवारी किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शनिवारी ६२.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनानंतरच्या १० दिवसांत 'धुरंधर 2'ने भारतात ७७८.७७ कोटी रुपयांचे निव्वळ आणि ९३०.४४ कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे. जगभरातील एकूण कमाईचा विचार करता, परदेशातील व्यवसायातून या आकड्यात आणखी २९६ कोटी रुपयांची भर पडली आहे. अशा प्रकारे, 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाचे जगभरात एकूण कलेक्शन १,२२६.४४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
कोइमोईच्या मते, 'धुरंधर २' चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने 'पुष्पा २' चा विक्रम मोडला आहे, ज्याने दुसऱ्या शनिवारी ४६ कोटी रुपये कमावले होते.
धुरंधर २ - ₹६२.८५ कोटी
पुष्पा २ - ₹४६ कोटी
धुरंधर - ₹४२ कोटी
स्त्री - ₹३३.८० कोटी
ॲनिमल - ₹३२.४७ कोटी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.