KBC: विराट कोहलीच्या फ्लाइंग किसवर अमिताभ बच्चन यांचा यॉर्कर; अनुष्का शर्मा क्लीनबोल्ड

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या कौन बनेगा करोडपती शोमध्ये स्टार्सना आमंत्रित करतात. एकदा अनुष्का शर्मानेही बिग बींच्या शोला भेट दिली होती. जिथे ज्येष्ठ अभिनेत्याने अनुष्काला खूप चिडवले.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam Tv
Published On

Amitabh Bachchan: भाकतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचे करोडो फॅन्स आहेत. विराट आणि अनुष्का त्यांच्या लग्नामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण विराटच्या एका रोमँटिक मूव्हमेंटमुळे राष्ट्रीय टेलिव्हिजनवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण, त्या क्षणाचा मुख्य आकर्षण म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अनुष्काची मस्करी केलेली आहे.

अनुष्का शर्मा एकदा 'कौन बनेगा करोडपती' मध्ये तिच्या 'सुई धागा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवनसोबत आली होती. शूटिंग दरम्यान ती एका स्पर्धकासोबत हॉट सीटवरही बसली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अनुष्का शर्मा यांनी त्यांची भरभरुन मस्करी केली.

Amitabh Bachchan
The Bengal Files: 'द बंगाल फाइल्स' रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविरोधात एफआयआर दाखल

अमिताभने अनुष्काची मस्करी केली

बिग बींनी प्रथम स्पर्धकाला विचारले की ती टीव्हीवर क्रिकेट पाहते का? जेव्हा त्याने उत्तर नाही असे दिले तेव्हा त्यांनी लगेच अनुष्काकडे बोट दाखवले, ज्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली. अनुष्काने सांगितले की ती तिच्या पतीमुळे क्रिकेट पाहते. मग अमिताभने तिला चिडवले, आणि म्हणाले, फक्त त्यांना पाहण्यासाठी?" त्यानंतर, अनुष्काने असेही म्हटले की ती मॅच टिमला पाठिंबा देते.

Amitabh Bachchan
Coolie VS War 2: सोमवारी 'कुली'ने मारली बाजी, केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री; जाणून घ्या 'वॉर २'चं कलेक्शन

इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी मैदानावर विराट कोहलीच्या खास फ्लाइंग किसचेही अनुकरण केले. बिग बींच्या या स्टाईलनंतर प्रेक्षक हास्याने फुलले. अनुष्कालाही तिचे हास्य आवरता आले नाही आणि वरुण धवनही खूप हसताना दिसला. डिसेंबर २०१७ मध्ये लग्न झालेल्या या कपलला आता दोन मुले आहेत, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com