MI vs DC : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन अचानक बदलला, नेमकं घडलं तरी काय?

Hardik Pandya Out : आयपीएलच्या या मोसमातील पहिलाच डबल हेडर सामना आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार अचानक बदलला. हार्दिक पंड्या संघाबाहेर असून, सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व दिलं आहे.
Mumbai Indians Captain Suryakumar Yadav (IPL/x)
Mumbai Indians Captain Suryakumar Yadav (IPL/x)saam tv
Published On

DC vs MI Live Score : यंदाच्या आयपीएलमधील पहिलाच डबल हेडर सामना आज, शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आजच्या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव हा संघाचं नेतृत्व करणार आहे.

आयपीएल स्पर्धेचा हा आठवा सामना आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. या दोन्ही संघांनी याआधीचा एकेक सामना जिंकलेला आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केलं. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने लखनऊ सुपर जायंट्सला सहा विकेटनं पराभूत केलं होतं.

दिल्ली संघाची प्लेइंग ११

केएल राहुल (विकेटकीपर), पी. निसांका, एन राणा, व्ही निगम, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, टी. स्टब्स, के. यादव, एल एनगिडी, टी नटराजन, एम कुमार.

मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११

रोहित शर्मा, आर. रेकल्टन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धिर, रदरफोर्ड, सँटनर, सी. बोसच, शार्दुल ठाकूर, डी चाहर, जसप्रीत बुमराह.

Mumbai Indians Captain Suryakumar Yadav (IPL/x)
IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com