Hardik Pandya: हार्दिकच्या बचावात पोलार्डची उडी! टी-२० वर्ल्डकपबाबत बोलताना म्हणाला...

Kieron Pollard On Hadik Pandya: हार्दिक पंड्याला सातत्याने ट्रोल केलं जात आहे. दरम्यान हार्दिकवर ट्रोल टीका करणाऱ्यावर कायरन पोलार्डने मोठं वक्तव्य केलं आहे.
kieron pollard came forward to support hardik pandya over critisim after mi vs csk game amd2000
kieron pollard came forward to support hardik pandya over critisim after mi vs csk game amd2000twitter

आयपीएल स्पर्धेतील २९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २०६ धावा केल्या. चेन्नईकडून शेवटच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एमएस धोनीने ४ चेंडूत ३ षटकार मारत २० धावांची खेळी केली. हार्दिकने या षटकात २६ धावा खर्च केल्या. दरम्यान या सुमार कामगिरीनंतर पुन्हा एकदा हार्दिक पंड्याला ट्रोल केलं गेलं आहे.

हार्दिक पंड्याने या सामन्यात गोलंदाजी करताना ३ षटकात २ गडी बाद केले. मात्र यादरम्यान त्याने ४३ धावा खर्च केल्या. त्याच्या शेवटच्या षटकात एमएस धोनीने २६ धावा कुटल्या. या षटकात धोनीने सलग ३ षटकार खेचले. गोलंदाजीत तर तो फ्लॉप ठरलाच. यासह फलंदाजीतही त्याला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका देखील केली गेली आहे. दरम्यान मुंबईचा हेड कोच कायरन पोलार्ड त्याचा बचाव करताना दिसून आला आहे.

kieron pollard came forward to support hardik pandya over critisim after mi vs csk game amd2000
MI vs CSK, IPL 2024: लाईव्ह सामन्यात पोलार्ड, टिम डेव्हिड अंपायरसोबत भिडले! नेमकं काय घडलं? -Video

या सामन्यानंतर कायरन पोलार्डने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला की, 'तो (हार्दिक पंड्या) आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला खेळाडू आहे . संघातील इतर खेळाडूंबरोबर त्याची वागणूक चांगली आहे. क्रिकेटमध्ये कधी चांगले दिवस येतात तर वाईट दिवसही येतात. मी एका अशा व्यक्तीला पाहतोय जो आपलं कौशल्य आणि क्षमता दाखवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतोय.'

kieron pollard came forward to support hardik pandya over critisim after mi vs csk game amd2000
RCB vs SRH, IPL 2024: फलंदाजांची चांदी की गोलंदाजांचा कहर? बंगळुरुची खेळपट्टी कोणाला साथ देणार? वाचा पिच रिपोर्ट

तसेच तो पुढे म्हणाला की, 'तो असा व्यक्ती आहे जो येत्या ६ आठवड्यानंतर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आम्ही सर्व त्याचा उत्साह वाढवतोय. आम्हालाही वाटतंय की त्याने चांगली कामगिरी करावी.'

हार्दिक पंड्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर,त्याने ६ सामन्यांमध्ये २६.२० च्या सरासरीने १३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान ३९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. गोलंदाजीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने ६ सामन्यांमध्ये ११ षटक गोलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याला केवळ ३ गडी बाद करता आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com