

आयपीएल २०२७ स्पर्धेच्या आधीच चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये मोठी ट्रेड डील झाली आहे. दोन्ही संघांत चार खेळाडूंसाठी ही ट्रेड डील झाली आहे. त्यानुसार, अष्टपैलू खेळाडू लियाम लिविंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स हे चेन्नई सुपर किंग्जमधून खेळतील, तर वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि नाथन एलिस हे सनरायझर्स हैदराबाद संघात असतील.
या ट्रेड डीलचे वैशिष्ट्य म्हणजे आयपीएलमधील सर्वात स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन हा चेन्नईच्या गोटात गेला आहे. हैदराबाद संघानं त्याला याआधी १३ कोटी मोजले होते. पण आता तो फक्त ६ कोटींमध्ये चेन्नईकडे गेला आहे. या ट्रेड डीलमध्ये त्याचं तब्बल ७ कोटींचं नुकसान झालं आहे. लिविंगस्टोन हा अष्टपैलू आहे. त्यामुळे चेन्नईला फलंदाजीसोबत गोलंदाजीतही पर्याय मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज जॅक एडवर्ड्स हा देखील चेन्नईच्या संघात असेल. सध्याच्या ३ कोटी रुपयांमध्येच तो या संघात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधीच हैदराबाद संघानं त्याला आपल्या संघात सहभागी करून घेतलं होतं. पण पायाला दुखापत झाल्यामुळे आयपीएलच्या गेल्या मोसमातील एकही सामना तो खेळू शकला नव्हता.
या ट्रेड डीलनुसार, सनरायझर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजीला धार येणार आहे. या संघात खलील अहमदचा समावेश करण्यात आला आहे. तो सध्याच्या ४.८ कोटी रुपयांमध्ये हैदराबाद संघात आला आहे. खलील यापूर्वी २०१८ ते २०२१ या मोसमात हैदराबाद संघाकडून खेळला आहे. खलीलने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईकडून गोलंदाजी करताना जबरदस्त कामगिरी केली होती. १४ सामन्यांत त्यानं १५ विकेट्स घेतल्या होत्या.
२०२६ मध्ये तो पाच सामने खेळला होता. आता तो हैदराबाद संघाशी जोडला गेलाय. खलीलमुळं त्यांच्या गोलंदाजीची धार वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज नाथन एलिस हा देखील हैदराबाद संघात गेला आहे. सध्याच्या २ कोटींमध्येच तो संघाशी जोडला गेलाय. अखेरच्या षटकांत खोचक मारा करण्याची त्याची क्षमता जबरदस्त आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.