IPL 2027 : आगामी आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल! या 4 दिग्गजांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Mumbai Indians coaching staff: आयपीएल २०२७ आधी मुंबई इंडियन्सने प्रशिक्षकांच्या टीममध्ये मोठे बदल केले आहेत. रॉबिन उथप्पा फलंदाजी प्रशिक्षक, मिचेल मॅक्लेनघन गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. धवल कुलकर्णी युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करणार असून उथप्पाच्या कमबॅकची चर्चा आहे.
Mumbai Indians coaching staff
Mumbai Indians coaching staffsaam tv
Published On: 

आयपीएल २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षकांच्या टीममध्ये मोठे बदल केलेत. भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याची टीमच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ही जबाबदारी किरॉन पोलार्ड याच्याकडे होती. महेला जयवर्धनेनंतर पोलार्डकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आलीये. याशिवाय मुंबई इंडियन्सने गोलंदाजी प्रशिक्षक, फिल्डींग प्रशिक्षक आणि युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकाच्या नावाचीही घोषणा केली आहे.

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज Mitchell Mcclenaghan याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलीये. याशिवाय भारताच्या माजी फिल्डींग प्रशिक्षक टी. दिलीप यांच्याकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आलीये. तर धवल कुलकर्णी युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे.

Mumbai Indians coaching staff
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावुक पोस्ट करत दिली माहिती

पहिल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता उथप्पा

रॉबिन उथप्पाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून केली होती. आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये तो मुंबईच्या टीमचा भाग होता. आता अनेक वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये परतला आहे.

मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत उथप्पाच्या नियुक्तीची माहिती दिलीये. या पोस्टमध्ये फ्रेंचायझीने म्हटलंय की, पहिल्या सिझनमध्ये टीमसोबत असलेला रॉबी आता मोठा अनुभव घेऊन परतलाय. खेळाची चांगली समज, त्याचे विचार स्पष्टपणे मांडण्याची क्षमता आणि युवा खेळाडूंना योग्य मार्ग दाखवणं टीमसाठी उपयोगी ठरेल. मुंबई इंडियन्सने या पोस्टमधून उथप्पाचे टीममध्ये स्वागतही केलंय.

Mcclenaghan आणि धवल कुलकर्णी यांचाही मुंबईशी जुना संबंध

Mitchell Mcclenaghan ने मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. २०१५ ते २०१९ या काळात त्याने मुंबईकडून ५६ सामने खेळलेत. या सामन्यांमध्ये त्याने ७१ विकेट्स घेतल्यात. मुंबई इंडियन्सने तीन वेळा विजेतेपद मिळवलं असून त्या टीमचाही तो भाग होता. आता खेळाडू म्हणून मुंबईकडून खेळल्यानंतर तो नव्या भूमिकेत टीमसोबत काम करणार आहे.

Mumbai Indians coaching staff
Neeraj Yadav Death: तीन गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूची आत्महत्या; राहत्या घरी सापडला मृतदेह

दुसरीकडे धवल कुलकर्णी हा रोहित शर्माच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. त्याने भारताकडून १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. धवलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवातही मुंबई इंडियन्सकडूनच केली होती. पहिले सहा सिझन तो मुंबईच्या टीममध्ये होता. त्यानंतर २०२० आणि २०२१ या सिझनमध्येही तो पुन्हा मुंबईच्या टीममध्ये सहभागी झाला होता. आता त्याच्याकडे युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असेल.

रॉबिन उथप्पाने मुंबई इंडियन्सवर केले होते गंभीर आरोप

रॉबिन उथप्पा याने यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप केले होते. त्याने काही वर्षांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये याबाबत खुलासा केला होता.

उथप्पाच्या म्हणण्यानुसार, २००८ च्या आयपीएल सिझननंतर मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने त्याच्यावर टीम सोडण्यासाठी दबाव टाकला होता. तसंच टीमबदलाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठीही त्याच्यावर दबाव आणण्यात आला होता, असा आरोप त्याने केला होता.

Mumbai Indians coaching staff
एकाच वेळी T20 - कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; ३५ चेंडूंत शतक ठोकणारा फलंदाज नंबर १

उथप्पाने आयपीएल २००८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून १४ सामने खेळले होते. या सामन्यांत त्याने ३२० रन्स केले होते. मात्र त्यानंतरच्या सिझनमपूर्वी मुंबईने त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) टीमकडे दिलं होतं. आता इतक्या वर्षांनंतर उथप्पा पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. यावेळी तो खेळाडू म्हणून नव्हे तर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून टीमची जबाबदारी सांभाळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.