

भारतीय पॅरा अॅथलेटिक्समधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. एशियन पॅरा गेम्समध्ये भारतासाठी तीन गोल्ड मेडल जिंकणारा अनुभवी खेळाडू नीरज यादव याचा मृत्यू झाला आहे. तो ४२ वर्षांचा होता. त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या मृत्यूमुळे क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त केला जातोय.
नीरज यादव यांना डोपिंग प्रकरणात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यात झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये त्याला सहभागी होता आलं नव्हतं. या घटनेनंतर त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आणि ही घटना कोणत्या परिस्थितीत घडली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भारतीय पॅरा अॅथलेटिक्स टीमचे मुख्य प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी नीरज यादव याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, नीरजने त्याच्या घरी विषारी पदार्थ खाल्ल्याचं सांगितलं जातंय. २८ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टन केलं जातंय. या घटनेमुळे प्रशिक्षक सत्यनारायण यांनी दुःख व्यक्त केलंय. नीरजने आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलंय.
नीरजने असं टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण माहीत नसल्याचं सत्यनारायण यांनी स्पष्ट केलंय. खेळाडूंच्या आयुष्यात अनेकदा चढ-उतार येतात. अशा वेळी त्यांनी संयम ठेवून परिस्थितीचा सामना करायला हवा, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
नीरज यादव हा भारतातील यशस्वी पॅरा खेळाडूंपैकी एक होता. त्याने त्याच्या खेळाच्या जोरावर देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून दिलेलं. एशियन पॅरा गेम्समध्ये त्याने तीन गोलड मेडल जिंकली होती. २०१८ मध्ये इंडोनेशियातील जकार्तामध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये नीरजने भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यानंतर २०२३ मध्ये चीनमधील हांगझोऊमध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्येही त्याने उत्तम कामगिरी केली.
नीरज यादव हा F55 प्रकारात खेळत होते. या प्रकारात खेळाडू बसलेल्या स्थितीत राहून विविध मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेतात. यात गोळाफेक, चक्काफेक आणि भालाफेक या खेळांचा समावेश होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.