ICC T20I rankings: टीम इंडियाच्या सलग तिसऱ्या विजयाने इंग्लंडच्या टीमचं वाढलं टेन्शन; टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानासाठी भारताची मोठी झेप

India T20 ranking: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिले तीन टी-२० सामने जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. आयसीसी क्रमवारीत भारत आणि इंग्लंडचे रेटिंग समान झाले असून, उर्वरित दोन सामन्यांतील विजयामुळे भारताला अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.
ICC T20I rankings
ICC T20I rankingssaam tv
Published On: 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० सिरीजमध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी केलीये. पहिले तीन सामने जिंकत टीम इंडियाने सिरीजही आपल्या नावावर केलीये. या सिरीजमधील अजून दोन सामने बाकी आहेत. दरम्यान सलग तीन विजयांमुळे टीम इंडियाला आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया पुन्हा एकदा जगातील नंबर वन टी-२० टीम बनण्याच्या जवळ पोहोचलीये. त्यामुळे सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या टीमची चिंता वाढली आहे.

तीन सामने जिंकताच भारताच्या रेटिंगमध्ये वाढ

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा सुरू आहे. या सिरीजमधील पहिला सामना २२ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला होता. या सिरीजपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरच्या आयसीसी टी-२० क्रमवारीत टीम इंडिया २६७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. तर इंग्लंडची टीम २६९ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर होती.

ICC T20I rankings
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ! IPL 2027 पूर्वी टीमने घेतला महत्त्वाचा निर्णय, 'या' दिग्गज खेळाडूची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

मात्र, न्यूझीलंडविरुद्धचे पहिले तीन सामने जिंकल्यानंतर भारताच्या रेटिंगमध्ये वाढ झालीये. २८ ऑक्टोबर रोजी टीम इंडियाची रेटिंग २६९ झालीये. इंग्लंडची रेटिंगही २६९ इतकीच आहे. त्यामुळे आता दोन्ही टीम्स पहिल्या क्रमांकासाठी चुरस पाहायला मिळतेय.

ICC T20I rankings
IPL 2027 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात अचानक मोठे बदल; पाच दिग्गजांचा टीमला रामराम

भारताला पुन्हा नंबर वन होण्याची संधी

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीम्सचे रेटिंग पॉईंट्स सध्या सारखेच आहेत. मात्र गुण पाहिल्यास इंग्लंडकडे अजूनही थोडी आघाडी आहे. त्यामुळे इंग्लंडची टीम सध्या पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पण भारताने अशीच दमदार कामगिरी सुरू ठेवली तर इंग्लंडला त्यांचं अव्वल स्थान गमवावं लागू शकतं.

शुक्रवारी रंगणार चौथा सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सिरीजचा चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार आहे. त्यानंतर रविवारी सिरीजमधील पाचवा आणि शेवटचा सामना होणार आहे. टीम इंडियाने हे दोन्ही सामने जिंकले, तर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचही सामन्यांत विजय मिळवण्याची संधी त्यांच्याकडे असेल.

भारताने सिरीजमध्ये न्यूझीलंडचा ५-० असा पराभव केला तर टी-२० क्रमवारीतही त्याचा फायदा होऊ शकतो. असं झाल्यास भारतीय टीम इंग्लंडला मागे टाकून पुन्हा एकदा जगातील नंबर वन टी-२० टीम बनू शकते. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.

ICC T20I rankings
IND vs NZ 3rd T20I: भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून दणदणीत विजय, 3-0 ने मालिका खिशात घातली

न्यूझीलंडच्या रेटिंगमध्ये घट

टी-२० क्रमवारीत भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी लढत सुरू असताना इतर टीमच्या स्थानातही फरक दिसतोय. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची टीम २६० रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडची टीम २४५ रेटिंग पॉईंससह चौथ्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धची सिरीज सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडची रेटिंग २४७ होती. मात्र सलग तीन सामने गमावल्यानंतर त्यांच्या रेटिंगमध्ये दोन पॉईंट्सची घट झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com