IND vs NZ 3rd T20I: भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून दणदणीत विजय, 3-0 ने मालिका खिशात घातली

India vs New Zealand T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड संघाने १९८ धावा केल्या. भारताच्या सलामीवीरांच्या तुफान फटकेबाजीनं न्युझीलंडनं गुडघे टेकले.
India vs New Zealand 3rd T20I result and highlights 2026
India vs New Zealand 3rd T20I result and highlights 2026saam tv
Published On: 
Summary
  • भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ६ गडी राखून पराभव केला

  • न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १९८ धावा केल्या.

  • अभिषेक शर्माने ३८ चेंडूंमध्ये ११३ धावांची तुफानी खेळी केली.

न्युझीलंडसाठी करो या मरो असलेल्या सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडचा सहा विकेट राखत पराभव केला. टीम इंडियानं या विजयासह मालिकाही आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने दिलेल्या 199 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाच्या दोन्ही ओपनर्सनी पहिल्याच ओव्हरपासून वादळी सुरूवात केली.टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या ओव्हरमधला सर्वाधिक स्कोअर टीम इंडियाच्या ओपनर्स केला.

या सामन्यात टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माला ओपनिंगला पाठवलं, यानंतर दोघांनी जेकब डफीच्या पहिल्याच ओव्हरला तब्बल 26 रन काढल्या. यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये भारताने 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 रन काढल्या. अभिषेकनं अवघ्या 15 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर पाच षटकात भारतीय संघानं 100 धावा पूर्ण केल्या होत्या. तर टीम इंडियाच्या ओपनर्सने सहा ओव्हर्सच्या पावरप्लेमध्ये 118 धावा कुठल्या होत्या. हा पावरप्लेमध्ये झालेला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील संघाने केलेला सर्वात मोठी धावसंख्या होती.

भारताच्या वेगवान धावसंख्येच्या पाठलागादरम्यान वैभव सूर्यवंशी बाद होणारा पहिला खेळाडू ठरला.त्याला मॅथ्यू फिशरने बाद केले. वैभवने 19 चेंडूंत 45 धावा केल्या. यात चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या टोकावर, अभिषेक शर्माने अवघ्या 35 चेंडूंत आपले चौथे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. शतक केल्यानंतर काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अभिषेक शर्माने 38 चेंडूंत 113 धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com