अखेर एमएस धोनीने घेतली निवृत्ती; आता चेन्नई सुपर किंग्ससाठी निभावणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी

Mahendra Singh Dhoni: ५ वेळचा आयपीएल विजेता एमएस धोनी यानं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. धोनी आता चेन्नईचा मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे.
MS Dhoni injury update IPL 2026
MS Dhoni injury update IPL 2026saam tv
Published On: 

आयपीएल २०२७ च्या रिटेन्शन सुरू असतानाच चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनी यानं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. 'कॅप्टन कूल' एमएस धोनी आता आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसणार नाही. धोनी आता एका नवीन भूमिकेत दिसणार असून, तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवा 'मेन्टर' म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आज धोनीच्या निवृत्तीची भावूक घोषणा केली. कॅप्टन कूल आणि 'थला' म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी आता खेळाडू म्हणून नव्हे, तर थेट 'मेंन्टर' म्हणून CSK ची धुरा सांभाळणार आहे. फ्रँचायझीने अधिकृतरीत्या याची घोषणा केली असून, धोनीचे संघासोबतचे जुने आणि घट्ट नाते नवीन भूमिकेतून पुढे सुरू राहणार आहे.

आयपीएलच्या सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सच्या यशाचा पाया रचण्यात आणि संघाला एका उंचीवर नेण्यात एमएस धोनीचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने ५ वेळा जेतेपदे पटकावलं आहे. आता मैदानावरील खेळाडूची भूमिका मागे पडल्यानंतर, धोनी नव्या पिढीच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आणि संघाची मोट बांधण्यासाठी 'मेंटर'च्या भूमिकेत दिसणार आहे.

MS Dhoni injury update IPL 2026
Gold Rate Today : खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी; सोन्याचे दर आजही घसरले! जाणून घ्या ताजे रेट्स

चेन्नई फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे की, धोनी हा नेहमीच संघाच्या ओळखीचा भाग राहिला आहे. चेन्नई हे नेहमीच त्याचे घर राहील. या निर्णयामुळे जगभरात पसरलेल्या पिवळ्या जर्सीच्या चाहत्यांमध्ये एकीकडे भावनिक वातावरण तयार झाले असले, तरी दुसरीकडे 'थला' नव्या भूमिकेत संघासोबत कायम राहणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

MS Dhoni injury update IPL 2026
वंदे भारतचा दरवाजा बंद झाला अन् १२ जण...,नातेवाईकाला सोडायला गेले अन् ३६ हजारांचा दंड; पाहा नक्की काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.