Vande Bharat Express Train Rules : तुम्ही-आम्ही बऱ्याचदा नातेवाईकांना किंवा मित्रांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जातो, गाडीत बसवतो आणि ट्रेन निघताना दुरून हातवरे करत निरोप देतो. पण, जर ती गाडी 'वंदे भारत' असेल आणि तुम्ही बाहेर पडण्याआधीच तिचा दरवाजा ऑटोमॅटिक लॉक झाला, तर काय होईल? उत्तर साधे आहे - पुढे घडणारं सगळं दृश्य एखाद्या सिनेमाच्या सीनसारखं असतं.
उत्तर प्रदेशातील इटावा स्टेशनवर असाच थरारक प्रसंग घडला. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नातेवाईकांना सोडायला गेलेले तब्बल १२ जण ट्रेनचे दरवाजे बंद झाल्यामुळे आतच अडकले. पुढच्या स्टेशनपर्यंतचा प्रवास फुकट गेलाच, पण त्यासोबतच रेल्वे प्रशासनाने या 'विनातिकीट' प्रवाशांना तब्बल ३६ हजारांचा दंड भरावा लागला.
नातेवाईकांना सोडण्यासाठी कानपूर स्टेशनवर आलेले १२ जण ट्रेनचे दरवाजे बंद झाल्याने वंदे भारतमध्येच अडकले. दरवाजे न उघडल्याने त्यांनी खाली उतरण्यासाठी गोंधळ घातला. ट्रेन कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर इटावा जंक्शनवर ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्वांना जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. ३६ हजारांचा दंड वसूल करून आणि सूचना दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
ट्रेन क्रमांक २२४१५, वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, वेळ रविवारी सकाळ, ठिकाण - कानपूर सेंट्रल स्टेशन
कानपूरमधील १२ जण नातेवाईकांना गाडीत चढण्यास मदत करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये गेले. त्याच वेळी दरवाजे बंद झाले. वंदे भारत एक्सप्रेसचे दरवाजे फक्त ठरलेल्या थांबा स्थानकांवरच उघडतात.
वाराणसीनंतर ट्रेन थेट नवी दिल्लीला जाण्यापूर्वी प्रयागराज आणि कानपूर येथे थांबते. त्यामुळे आतमध्ये अडकलेल्यांमध्ये घबराट पसरली. त्यांनी ट्रेन थांबवून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून वंदे भारत थांबवण्यास नकार दिला. त्या लोकांनी गोंधळ सुरू केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण केंद्राला माहिती दिली. स्टेशनच्या सूचनेनुसार, सकाळी १०:४९ वाजता ट्रेन इटावा जंक्शनवर थांबवण्यात आली. स्टेशन अधीक्षक पी. एम. मीना, आरपीएफ निरीक्षक दिनेश कुमार आणि जीआरपी निरीक्षक यदुवीर सिंग त्यांच्या पथकासह तेथे पोहोचले. सर्व १२ जणांना ट्रेनमधून बाहेर काढून आरपीएफ चौकीवर नेण्यात आले.
आरपीएफ निरीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. गोंधळ आणि प्लॅटफॉर्म तिकिटांच्या अभावामुळे ३६,००० रुपयांचा दंड वसूल करून प्रति व्यक्ती ३,००० रुपयांचे तिकीट दिले. ही चूक पुन्हा न करण्याची ताकीद देऊन सर्वांना सोडून देण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.