

दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. सोमवारही सोनं स्वस्त झालं होतं. मुंबई,पुण्यापासून दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकात्यामध्येही सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. goodreturns नुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा १,३६,२०० रूपये इतकी झाली आहे. आज सोन्याच्या दरात ७५० रूपयांची घसरण झाली.
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना आता सोने खरेदी करणे काहीसे परवडणारे ठरणार आहे. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी किंवा गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी ही घसरण एक उत्तम संधी ठरू शकते. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, किमतींमधील या चढ-उतारामुळे ग्राहकांचा ओढा पुन्हा एकदा सोने खरेदीकडे वाढू शकतो.
२४ कॅरेट सोने
१ ग्रॅम: १३,६२० रुपये (७५ रुपयांची घट)
१० ग्रॅम: १,३६,२०० रुपये (७५० रुपयांची घट)
१०० ग्रॅम: १३,६२,००० रुपये (७,५०० रुपयांची घट)
२२ कॅरेट सोने
१ ग्रॅम: १२,४८५ रुपये (७० रुपयांची घट)
१० ग्रॅम: १,२४,८५० रुपये (७०० रुपयांची घट)
१०० ग्रॅम: १२,४८,५०० रुपये (७,००० रुपयांची घट)
१८ कॅरेट सोने:
१ ग्रॅम: १०,२१८ रुपये (५७ रुपयांची घट)
१० ग्रॅम: १,०२,१८० रुपये (५७० रुपयांची घट)
१०० ग्रॅम: १०,२१,८०० रुपये (५,७०० रुपयांची घट)
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेक घरांमध्ये दागिन्यांच्या खरेदीची लगबग सुरू आहे. अशा वेळी सोन्याच्या दरात झालेली ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक ठरत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या किमतीतील चढ-उतारामुळे सराफा बाजारात दरांमध्ये बदल होत असतात. त्यामुळे जे नागरिक सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी दर कमी असताना टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
सोन्यानंतर आता चांदीच्या दरांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सराफा बाजारात आज चांदीच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. मागील काही दिवसांच्या तुलनेत चांदीच्या दरांमध्ये स्थिरता पाहायला मिळत असल्याने ग्राहकांसाठी हा एक दिलासा आहे.
१ ग्रॅम: ₹१९०
१० ग्रॅम: ₹१,९००
१०० ग्रॅम: ₹१९,०००
१ किलोग्राम (१००० ग्रॅम): ₹१,९०,०००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.