IPL मध्ये मोठी उलथापालथ; अचानक वेळापत्रकात मोठा बदल, ऐनवेळी ठिकाणच बदलले, काय आहे कारण?

GT vs CSK Match New Venue And Timing Details: गुजरातमधील महापालिका निवडणुकांमुळे IPL 2026 च्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना आता अहमदाबादऐवजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.
GT vs CSK IPL match shifted from Ahmedabad to Chennai due to Gujarat civic elections
GT vs CSK IPL match shifted from Ahmedabad to Chennai due to Gujarat civic electionsSaam Tv
Published On

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील 26 एप्रिल आणि 21 मे रोजी होणाऱ्या दोन सामन्यांची ठिकाणे अचानक बदलण्यात आली आहे. 26 एप्रिल रोजी अहमदाबाद आणि गुजरातमध्ये काही महापालिका निवडणुक पार पडणार असल्यामुळे हा बदल केला आहे असे BCCI ने सांगितले आहे. त्यामुळे अआता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील 26 एप्रिल रोजी अहमदाबाद येथे होणारा दुपारचा सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे.

BCCI ने IPL 2026 च्या वेळापत्रकात सुधारणा केली असून या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील दुपारचा जो 26 एप्रिल 2026 रोजी खेळवला होता. तो आता चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. आणि हा सामना हा दुपारी 3.30 वाजता सुरू होईल असे BCCI ने सांगितले.

GT vs CSK IPL match shifted from Ahmedabad to Chennai due to Gujarat civic elections
MI vs DC : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन अचानक बदलला, नेमकं घडलं तरी काय?

दरम्यान अहमदाबाद व्यतिरिक्त सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर, जामनगर, करमसद-आनंद, गांधीधाम, नडियाद, नवसारी, पोरबंदर, मेहसाणा, मोरबी, वापी आणि सुरेंद्रनगर येथेही महापालिका निवडणुका होणार आहेत. 28 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर IPL च्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com