IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ३ फॉरमॅटसाठी ३ वेगवेगळे कर्णधार; पाहा संपूर्ण संघ

Team India squad: आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दोन कर्णधार निवडण्यात आले आहेत. एकजण टी२० संघाचे नेतृत्व करेल तर दुसरा एकदिवसीय सामन्याच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आलीय.
Team India squad
Team India squadSaam Tv
Published On

Indian Cricket Team squad For south Africa Tour :

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आलीय. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघ निवडीचा निर्णय घेतला. या दौऱ्यासाठी दोन कर्णधार निवडण्यात आले आहेत. टी२० साठी सूर्यकुमारला तर एकदिवसीय सामन्यांसाठी के. एल. राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या सामन्यांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात आलीय. परंतु ते दोघेही कसोटी मालिकेदरम्यान पुनरागमन करणार आहेत. (Latest News)

बीसीसीआयने याविषयीची एक विशेष नोट जारी केलीय. दरम्यान पांढऱ्या चेंडूच्या सामन्यातून विश्रांती द्यावी यासाठी रोहित आणि विराटने बोर्डाकडे विनंती केली होती. तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे. शमी या दौऱ्यासाठी उपलब्ध असेल का नसेल हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. दरम्यान शमीला केवळ कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

रहाणे कसोटी संघाबाहेर, राहुल-श्रेयसचे पुनरागमन

बुमराह आणि अंजिक्य राहणेला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. यामागे कारण म्हणजे त्याची कामगिरी. वेस्ट इंडिज दौऱ्यात तो विशेष काही करू शकला नाही. दोन कसोटी सामन्यांच्या दोन डावात त्याला केवळ ११ धावा करता आल्या. तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने ८९ आणि ४६ धावांची इनिंग खेळली होती. या फायनलमधूनच रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन झालं होतं. त्यापूर्वी त्याला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नव्हती.

याशिवाय चेतेश्वर पुजारालाही कसोटी संघातून डच्चू देण्यात आलाय. पुजाराने शेवटचा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात खेळाला होता. जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दोन डावात १४ आणि २७ धावांची खेळी केली होती. तेव्हापासून पुजारा कसोटी संघाच्या बाहेरच आहे. तर केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. श्रेयसने या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.

तर राहुलने मागील कसोटी सामना फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधात खेळला होता. त्याचबरोबर बुमराहने दीडवर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. त्याने मागील कसोटी सामना हा जुलै २०२२ मध्ये इंग्लंडच्याविरोधात खेळला होता. तसेच बुमराहाला उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल ( यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

टी२० मध्ये शुभमन गिल, रविंद्र जडेजाचं पुनरागमन

सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचे कर्णधारपद देण्यात आलंय. त्याचबरोबर रविंद्र जडेजाला उप कर्णधारपद देण्यात आलंय. संघात बहुतेक तेच खेळाडू आहेत जे सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात टी-२० मालिका खेळत आहेत.

टी२० सामन्यांसाठी भारतीय संघ

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रविंद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

Team India squad
India Tour Of Sri Lanka: टीम इंडियाच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा! टी-२० वर्ल्डकपनंतर जाणार 'या' देशाच्या दौऱ्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com