World cup 2023: कसोटी टीम इंडियाची... प्रॅक्टिस न करताच मैदानात उतरणार; पास होणार की नापास?

World cup 2023: भारत विरुद्ध नेदरलँडमध्ये होणारा सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
world cup 2023 team india
world cup 2023 team india Saam tv news
Published On

IND vs NED Highlights:

भारत विरुद्ध नेदरलँडमध्ये होणारा सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तिरुवनंतपुरममध्ये होणाऱ्या सराव सामन्याचा नाणेफेक देखील झाला नाही. यामुळे टीम इंडिया आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रॅक्टिस न करता मैदानात उतरणार आहे. (Latest Marathi News)

५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. या वर्ल्डकपसाठी १० संघाला २-२ सराव सामने खेळण्याची संधी दिली होती. भारताचा ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. भारताचा ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे.

world cup 2023 team india
Asian Games: अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस; पारुलची मोठी धाव; ५ हजार मीटर शर्यतीत गाठलं सुवर्ण पदक

भारताचा पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. तर ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा नेदरलँडशी सामना होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना हा १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.

टीम इंडियाला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने या आधी १९८३, २०११ साली वर्ल्डकप जिंकला होता.

वर्ल्डकपचे सामने देशातील १० शहरात होणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाळा, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बेंगळुरु, मुंबई आणि कोलकाता या शहरात सामने होणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहे.

world cup 2023 team india
IND vs NEP Highlights: आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचा रिंकू 'यशस्वी'; थेट सेमीफायनलमध्ये धडक

तत्पूर्वी, टीम इंडियाचा पहिला सराव सामना इंग्लंडशी होणार होता. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध होणारा सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. त्या सराव सामन्यात टीम इंडिया नाणेफेक जिंकूनही सामना रद्द झाला होता. त्यानंतर आता टीम इंडियाचा दुसराही सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com