भारतीय संघ येत्या डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी-२० मालिका खेळताना दिसून येणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना येत्या १० डिसेंबरपासुन खेळला जाणार आहे. या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या दौऱ्यावर अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. माध्यमातील वृत्तानूसार, वनडे आणि टी-२० मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसून येणार नाही. तर हार्दिक पंड्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो देखील या मालिकेसाठी उपलब्ध नसेल. या दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी केएल राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. (India Tour Of South Africa)
सध्या सुरु असलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतही विराट आणि रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानूसार बीसीसीआय सचिव जय शाह आणि प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भारतीय संघाबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. (Latest sports updates)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात येऊ शकते. तर चेतेश्वर पुजाराला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीलाही संधी मिळू शकते.
असं आहे वेळापत्रक..
१० डिसेंबर २०२३: पहिला टी -२० सामना, डर्बन
१२ डिसेंबर २०२३: दुसरा टी -२० सामना, ग्केबेरहा
१४ डिसेंबर २०२३ : तिसरा टी -२० सामना, जोहान्सबर्ग
१७ डिसेंबर २०२३: पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग
१९ डिसेंबर २०२३ : दुसरा वनडे सामना, ग्केबेरहा
२१ डिसेंबर २०२३: तिसरा वनडे सामना, पार्ल
२६ ते ३० डिसेंबर, २०२३: पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन
३ जानेवारी ते ७ जानेवारी, २०२४: दुसरा कसोटी सामना, केपटाऊन
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.