IBSA World Games: भारतीय दृष्टिहीन महिला क्रिकेट संघाची कमाल; ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जिंकलं सुवर्णपदक

भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने आईबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये शानदार प्रदर्शन करत इतिहास रचला आहे.
IBSA World Games
IBSA World GamesSaam tv
Published On

IBSA World Games Indian Womens Blind Cricket Team

भारतीय दृष्टिहीन महिला क्रिकेट संघाने आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये शानदार प्रदर्शन करत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक खिशात टाकलं आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून सुवर्णपदक जिंकलं आहे. (Latest Marathi News)

भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने आयबीएस वर्ल्ड गेम्समध्ये जोरदार खेळ दाखवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला आहे. या स्पर्धेत तिसरा सामना ऑस्ट्रेलियासोबत झाला. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात आठ गडी गमावून ११४ धावा ठोकल्या होत्या. तर टीम इंडियाने ३.३ षटकात १ गडी गमावून ४३ धावा ठोकल्या. सामन्यादरम्यान पाऊस पडल्याने खेळ थांबवावा लागला. मात्र, भारतीय संघाचा रनरेट चांगला होता. त्यामुळे भारतीय संघाची चांगल्या नेट रनरेटमुळे विजेता म्हणून निवड करण्यात आली.

IBSA World Games
Asia Cup 2023: आमंत्रण फेटाळलं! आशिया चषकासाठी BCCI अधिकाऱ्यांचा पाकिस्तानात जाण्यास नकार;समोर आलं मोठं कारण

तत्पूर्वी, टीम इंडियाने पहिल्यांदा आयबीएस वर्ल्ड गेम्समध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा मान पटकावला आहे. या आधी भारताच्या दृष्टिहीन महिला संघाने एकदाही सुवर्णपदक जिंकलं नव्हतं.

IBSA World Games
Asia Cup 2023: आशिया चषकाचा संघ पाहून Mr.360 लाही फुटला घाम! प्रमुख खेळाडूला वगळण्यावरून मोठं वक्तव्य

दरम्यान, भारतीय दृष्टिहीन पुरुष क्रिकेट संघाने आयबीएसए स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. तर आता अंतिम फेरीत भारतीय दृष्टिहीन पुरुष क्रिकेट संघासमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. भारतीय दृष्टिहीन महिला संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com