Asia Cup 2023: आशिया चषकाचा संघ पाहून Mr.360 लाही फुटला घाम! प्रमुख खेळाडूला वगळण्यावरून मोठं वक्तव्य

Team India Asia Cup Squad: एबी डिव्हिलीयर्सने भारतीय संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
AB de Villiers
AB de Villierssaam tv
Published On

AB de Villiers On Team India Asia Cup Squad:

आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी २१ ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या घोषणेनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ज्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलीयर्सचा देखील समावेश आहे.

AB de Villiers
IND VS IRE 3rd T2OI: 'हे खूप निराशाजनक होतं..' मालिका जिंकूनही कॅप्टन बुमराह या कारणामुळे नाराज

एबी डिव्हिलीयर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, 'हे माझ्यासाठी धक्कादायक होते. मला असं वाटतं की,फिरकी गोलंदाज म्हणून युजी(युजवेंद्र) एक उत्तम पर्याय आहे. आपल्याला माहित आहे की, तो किती स्मार्ट आहे. मात्र आता निर्णय झाला आहे,जे आहे ते आहे.'

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा वेस्टइंडीज दौरा पार पडला. या दौऱ्यावर चहलला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

त्याच्याऐवजी आशिया चषकाच्या संघात कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे. भारतीय संघाला फलंदाजीत खोली हवी आहे.त्यामुळे चहलला या संघात स्थान दिले गेले नाही.

कुलदीप यादव फिरकी गोलंदाजी करण्यासह फलंदाजीतही मोलाचे योगदान देऊ शकतो. त्यामुळे त्याला या संघात स्थान दिले गेले आहे. (Latest sports updates)

AB de Villiers
World Cup 2023, Playing XI: वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलींनी निवडली टीम इंडियाची प्लेइंग ११; विराटच्या खास भिडूला ठेवलं संघाबाहेर

तसेच एबी डिव्हिलीयर्सने जसप्रीत बुमराहच्या कमबॅकबाबत देखील भाष्य केले आहे. त्याच्याबद्दल बोलताना एबी डिव्हिलीयर्स म्हणाला की, 'दुखापतीतून कमबॅक केल्यानंतर त्याने आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावला. यावरून दिसून येतं की तो किती टॅलेंटेड आहे. त्याला चांगली कामगिरी करताना पाहून मी मुळीच आश्चर्यचकीत झालो नाही. त्याला फॉर्ममध्ये परतल्याचं पाहून बरं वाटतंय.'

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com