India Tour Of Sri Lanka: टीम इंडियाच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा! टी-२० वर्ल्डकपनंतर जाणार 'या' देशाच्या दौऱ्यावर

Team India New Schedule: भारतीय संघ २०२४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे
team-india
team-indiasaam tv news
Published On

India Tour Of Sri Lanka 2024:

भारतीय संघ २०२४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. ही मालिका टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर होणार आहे.

श्रीलंकेचा संघ २०२४ मध्ये कोणकोणत्या संघासोबत खेळणार याचं संपुर्ण वेळापत्रक श्रीलंका क्रिकेट बोर्डने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे. सुरुवातीला श्रीलंकेचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहेत.

झिम्बाब्वेचा संघ जानेवारी २०२४ मध्ये श्रीलंकेचा दौरा कराणार आहे. त्यानंतर जानेवारी -फेब्रुवारी दरम्यान श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. ही मालिका झाल्यानंतर फेब्रुवारी-मार्च दरम्यान बांग्लादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये वनडे, टी-२० आणि कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. (Latest sports updates)

team-india
IND vs AUS: इथेच चूक झाली! काय आहे टीम इंडियाच्या पराभवाचं नेमकं कारण?

जूनमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्डकप झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. ही मालिका झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्टइंडिजविरुद्ध दोन हात करताना दिसून येईल.

श्रीलंकेचा संघ यावर्षी भारत दौऱ्यावर आला होता. या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांचा थरार रंगला होता. या दोन्ही मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला होता. टी-२० मालिका भारतीय संघाने २-१ ने खिशात घातली होती. त्यानंतर वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती.

team-india
Rohit Sharma News: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! रोहित शर्माबाबत समोर आली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com