ICC Rules : क्रिकेट विश्वात उडणार खळबळ; आयसीसी बदलणार ४ नियम, सामना सुरू असतानाच चेंडू बदलणार रंग

icc may change major cricket rules from october 2026 : आयसीसी लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडणार आहे. आयसीसी नेमके कोणते चार नियम लागू करण्याची शक्यता आहे, हे जाणून घेऊयात.
क्रिकेट वर्तुळात खळबळ उडणार, ४ नवे नियम लागू होण्याची शक्यता
icc may introduce four major cricket rule changes including pink ball use in tests. AIsaam tv
Published On

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. यात केवळ टी २० नाही तर, वनडे, कसोटी क्रिकेटचाही समावेश आहे. सामना सुरू असतानाच अचानक लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरला जाऊ शकतो. हे सर्व नवे बदल आयसीसीच्या विचाराधीन आहेत. पण ते लवकरच अंमलात आणले जाऊ शकतात. ३० मे रोजी अहमदाबादमध्ये आयसीसीची बोर्ड मिटिंग होणार आहे. त्यात काही नियमांना मंजुरी मिळू शकते.

१ ऑक्टोबर २०२६ पासून हे सर्व नवे बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू केले जाऊ शकतात, असे सांगितले जाते. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, प्रस्तावित बदल होणार आहेत, त्यात मुख्य प्रशिक्षकला ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मैदानात जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. वनडे क्रिकेटमध्ये हा नियम केला जाऊ शकतो. वनडे क्रिकेटमध्ये फक्त सब्स्टिट्युट फील्डरचाच ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मैदानात जाण्याची मुभा असते. सध्याच्या नियमानुसार, खेळाडूंना पाणी घेऊन मैदानात जाणाऱ्या खेळाडूला विशिष्ट ड्रेस योग्यरितीने परिधान करावा लागतो.

याशिवाय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला ड्रिंक्स ब्रेकवेळी मैदानात जाण्याची परवानगी दिली तर, त्यालाही संघाची जर्सी घालावी लागणार की नाही, याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. वनडे क्रिकेटमध्ये प्रत्येक डावात दोन ड्रिंक्स ब्रेक होत असतात. प्रत्येक तास किंवा एक तास दहा मिनिटांनी एक ब्रेक होतो. तर टी २० क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकाला टॅक्टिकल कारणांमुळे ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मैदानावर खेळाडूंना सल्ला देण्याची परवानगी आधीपासूनच आहे.

टी २० आंतरराष्ट्रीय सामन्याबाबतही नवा नियम केला जाऊ शकतो. इनिंग ब्रेकची वेळ कमी करून १५ मिनिटे करण्याचीही योजना आहे. सध्या दोन डावांमध्ये २० मिनिटांचा ब्रेक असतो. मध्यांतराआधी कॉल ऑफ टाइमपासून मध्यांतरानंतर पुन्हा कॉल ऑफ प्लेपर्यंत असतो. यापुढे या वेळेतील पाच मिनिटे कमी केली जाऊ शकतात, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय आणखी एक प्रस्तावित बदल आहे.

क्रिकेट वर्तुळात खळबळ उडणार, ४ नवे नियम लागू होण्याची शक्यता
Virat Kohli: भर मैदानात ट्रेविस हेडशी भिडला विराट कोहली; सामन्यानंतर हँडशेक करणंही टाळलं, नेमकं काय घडलं, VIDEO

फिल्ड अंपायर हॉकआई टेक्नॉलॉजीने गोलंदाजाची गोलंदाजी अॅक्शन वैध आहे की अवैध आहे हे तपासू शकतात. पण हे कसे ठरवले जाईल किंवा अंपायर्सना काय करावे लागेल याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. तर सगळ्यात मोठा बदल हा कसोटी क्रिकेटमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. सामना सुरू असतानाच, रेड बॉल बदलून पिंक बॉल खेळण्यासाठी दिला जाऊ शकतो. पावसामुळे व्यत्यय आलेल्या किंवा खराब प्रकाशमान असलेल्या सामन्यात त्याचा वापर केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

हे ४ नियम बदलणार

  • वनडे क्रिकेटमध्ये ड्रिंक्स ब्रेकला मुख्य प्रशिक्षक मैदानात येऊ शकतात.

  • टी २० क्रिकेटमध्ये इनिंग ब्रेक २० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आणला जाऊ शकतो.

  • फील्ड अंपायर हॉकआईच्या मदतीने बॉलरच्या अॅक्शनची तपासणी करू शकतात

  • कसोटी सामन्यातच रेड बॉल बदलून पिंक बॉल वापरण्याची शक्यता

क्रिकेट वर्तुळात खळबळ उडणार, ४ नवे नियम लागू होण्याची शक्यता
IPL 2006: राजा की रंक! पंजाब किंग्ससमोर 'करो की मरो'ची स्थिती; जाणून घ्या प्लेऑफचं संपूर्ण समीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com