Hardik Pandya GF : हार्दिक भाऊचा नाद करायचा नाय! भारत-पाकिस्तान सामन्यात दिसली पंड्याची नवी गर्लफ्रेंड, फोटो व्हायरल

Hardik Pandya Rumored GF : दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी हार्दिक पंड्याची नवी गर्लफ्रेंड आल्याचे म्हटले जात आहे. कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड? पाहा फोटो.
Hardik Pandya GF
Hardik Pandya GF Saam Tv
Published On

Hardik Pandya : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यामध्ये बाबर आझमची विकेट हार्दिक पंड्याने घेतली. विकेटनंतर हार्दिकने बाबरला गमतीने टाटा देखील केले. त्यावेळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण सोशल मीडियावर हार्दिकच्या नावाची वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे.

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी हार्दिक पंड्याची कथित गर्लफ्रेंड दुबईला पोहोचली. सामन्यादरम्यान ती कॅमेऱ्यामध्येही कैद झाली. हार्दिक पंड्याच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव जास्मिन वालिया असे आहे. मागच्या वर्षापासून हार्दिकशी जास्मिनचे नाव जोडले जात आहे. आज पंड्याला सपोर्ट करण्यासाठी जास्मिन सामना पाहायला आल्याचे चाहते म्हणत आहेत.

Hardik Pandya GF
Ind vs Pak : भारताला हरवण्यासाठी जादूटोणा? रिझवानचा तो फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी घेतली मजा..

चाहत्यांमध्ये हार्दिकच्या नव्या गर्लफ्रेंड कुतूहल आहे. रिपोर्टनुसार हार्दिक पंड्या मागील काही कालावधीपासून जास्मिन वालियासह रिलेशनशिपमध्ये आहे. ग्रीसमध्ये एकाच ठिकाणी दोघांचे वेगवेगळ्या अ‍ँगलमधले फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान जास्मिन आजच्या सामन्याला हजर राहिल्याने या चर्चांना उधाण आले आहे.

हार्दिक पंड्याने मे २०२० मध्ये नताशा स्टॅनकोविचशी लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली होती. दरम्यान जुलै २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर हार्दिकच्या आयुष्यात जास्मिनची एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे. चर्चा होत असल्या तरी हार्दिक आणि जास्मिन या दोघांनीही रिलेशनबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

Hardik Pandya GF
IND vs PAK Match Live Score : भारताचा 'विराट' विजय; पाकिस्तानला दुबईत धूळ चारली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com