Ind vs Pak : भारताला हरवण्यासाठी जादूटोणा? रिझवानचा तो फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी घेतली मजा..

Mohammad Rizwan Photo : भारत आणि पाकिस्तानचा सामना दुबईत सुरु आहे. या सामन्यातला पाकिस्तानच्या कर्णधाराचा, मोहम्मद रिझवानचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
Mohammad Rizwan Viral Photo Ind vs pak
Mohammad Rizwan Viral Photo Ind vs pakSaam Tv
Published On

Mohammad Rizwan Viral Photo : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुढे पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर मैदानात उतरले. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर रिझवान हातात जपमाळ घेऊन काहीतरी करत असल्याचे पाहायला मिळाले.

बाबर आझम आणि इमाम उल हक या दोन्ही सलामीवीरांना पाकिस्तानची चांगली सुरुवात केली. आठव्या षटकामध्ये हार्दिक पंड्याने टाकलेल्या चेंडूला फटका मारत असताना बाबर आझम बाद झाला. केएल राहुलने त्याचा झेल घेतला. लगेचच नवव्या षटकामध्ये अक्षर पटेलने इमाम उल हकला धावचीत केले. सलग सलामीवीर तंबूत गेल्यानंतर कर्णधार रिझवान मैदानात उतरला.

Mohammad Rizwan Viral Photo Ind vs pak
IND vs PAK: 'बापू'चा नाद करायचा नाय! अक्षरचा वाऱ्याच्या वेगानं थ्रो, पाकिस्तानला 440 व्होल्टचा झटका; VIDEO पाहिला का?

सामन्याच्या सुरुवातीला जेव्हा मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता, त्यावेळेस कॅमेरामॅनने मोहम्मद रिझवानकडे कॅमेरा वळवला. तेव्हा रिझवान हातात जपमाळ प्रमाणे काहीतरी घेऊन प्रार्थना करत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान समालोचन करणाऱ्या वहाब रियाजने याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. रिझवान हा कलमा पठण करत असल्याचे वहाब रियाजने सांगितले.

पाकिस्तानच्या कर्णधाराचा हा फोटो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वापरुन नेटकऱ्यांनी अनेक मीम्स बनवले आहेत. व्हायरल फोटोवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. काहींनी आजचा सामना जिंकण्यासाठी मोहम्मद रिझवान जादूटोणा करत असल्याचे म्हटले आहे. आधीही मोहम्मद रिझवानचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Mohammad Rizwan Viral Photo Ind vs pak
IND vs PAK : मोहम्मद शमीला झालंय तरी काय? पहिल्याच षटकात टाकले ११ बॉल, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com